कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ,केंद्र सरकारची घोषणा

केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (Dearness allowance) 25 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Central government  announces increase in DA
Central government announces increase in DADainik Gomantak

केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) 7 वा वेतन आयोग (7th pay commission) मिळाल्यानंतर आता 6 व्या वेतनश्रेणी मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक आनंदाची बातमी सरकारने दिली आहे.सरकारने त्याच्या पगारात बम्पर वाढ करण्याची एक नवीन योजना आणली आहे.केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (Dearness allowance) 25 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. एप्रिल 2020 मध्ये या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील गोठवण्यात आला होता.(Central government announces increase in DA)

या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता(DA) देखील 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी कमी करण्यात आला होता.या काळात त्यांना 164 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.सरकारने आतातोच महागाई भत्ता वाढवून 189 टक्के करण्याचा निर्णय आहे, जो 1 जुलै 2021 पासून लागू असेल. यापूर्वी महागाई भत्ता फक्त 164 टक्के दराने देण्यात आला होता.

Central government  announces increase in DA
नवीन स्टार्ट-अप करणाऱ्यांना मिळणार LICची आर्थिक मदत

https://www.youtube.com/watch?v=-eBsw6V8cNA&t=61s

अर्थ मंत्रालयातील संचालक निर्मला देव यांच्या मते, हा आदेश केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांसाठी जारी करण्यात आला आहे, जे सध्या सहाव्या वेतनश्रेणी अंतर्गत वेतन घेत आहेत. या आदेशाची प्रत C&AG आणि UPSC सह इतर विभागांना पाठवण्यात आली आहे.

अखिल भारतीय लेखा आणि लेखापरीक्षण समितीचे सरचिटणीस हरीशंकर तिवारी म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावरील बंदी हटवल्यामुळे वेतनात लक्षणीय वाढ होईल. याचा परिणाम घरभाडे भत्त्यावरही होईल. वित्त मंत्रालयाने 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत शहरनिहाय HRA वाढवून 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के केले आहे. हे वर्गीकरण X, Y आणि Z वर्गाच्या शहरांनुसार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com