कोरोना विषाणूचा धोका पाहता सध्या सर्वत्र खबरदारी घेतली जातेय . याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर केंद्र सरकारही सतर्क झालं आहे.
केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मंगळवारी देशभरात मॉक ड्रील करण्यात येणार आहे. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाबरुन जाऊ नका, कोरोनाच्या नियमांचं पालन करा, असे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये सिनेमागृह (movie theatres), शाळा आणि कॉलेजमध्ये (schools&colleges) मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेकजण पब, हॉटेल, बार आणि पर्यटनस्थळावर गर्दी करतात. कर्नाटक सरकारनं पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. तसेच राज्यभरात नवीन वर्षाचं स्वागत मध्यरात्री एक वाजेपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात आज 196 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरात मास्कसक्ती करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करत नवीन वर्षाचं स्वागत करा, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे.
मंगळवारी देशभरात मॉक ड्रील -
27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग क्षमता वाढवणे आणि RT-PCR, RAT किट्सची उपलब्धता, टेस्ट उपकरणांची उपलब्धता इत्यादींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रानं राज्यांना दिल्या आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.