Razorpay ESOPs Dainik Gomantak
देश

Razorpay ESOPs: खुशखबर!! Razorpay चे दहाव्या वर्षात पदार्पण; कर्मचाऱ्यांना मिळणार 1 लाखांचा ESOP

Employee Stock Ownership Plans: कंपनी रुजू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १ लाख रुपये किमतीचे कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOPs) ऑफर करेल

Akshata Chhatre

Employee Stock Ownership Plan

दहाव्या वर्धापनदिनानिमित्त YCombinator या कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ही कंपनी रुजू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १ लाख रुपये किमतीचे कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOPs) ऑफर केला आहे आणि यात महत्वाची बाब म्हणजे कंपनीजवळ तीन हजारपेक्षाही अधिक कर्मचारी आहेत. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या या ऑफरला अंतर्गत "रेझर" असं म्हणून ओळखलं जातंय.

कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, भले मग तो यापूर्वी ESOPचा भाग नसलेला का होईना त्यांचा कंपनीच्या भविष्यात महत्त्वाचा वाटा आहे.

कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ हर्षिल माथूर यांनी या संबंधित बोलताना म्हणालेत की "आम्ही नावीन्य आणणे, पैशाची चलनवलन सुलभ करणे आणि भारतातील आणि त्यापुढील व्यवसायांसाठी अधिक मूल्य निर्माण करणे सुरू ठेवत असताना यशामध्ये प्रत्येक सहकाऱ्याचा सहभाग सुनिश्चित करण्याचा ESOP उपक्रम हा आमचा मार्ग आहे."

Razorpay ने यापूर्वी देखील कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यासाठी ESOPs ऑफर केले होते. वर्ष २०१८ मध्ये त्याच्या पहिल्या ESOP बायबॅकने १४० कर्मचाऱ्यांना शेअर्स लिक्विडेट करण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर वर्ष २०२२ मध्ये ७५-दशलक्ष बायबॅक झाला, ज्यामुळे ६५० कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता.

साल २०१४ मध्ये स्थापन झाल्यापासून कंपनीने लक्षणीय वाढ करून दाखवली आहे, कंपनी भारतातील १०० पैकी ८० युनिकॉर्नसाठी पेमेंट करते आणि ३०० दशलक्षाहून अधिक अंतिम ग्राहकांना सेवा देते. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये पेमेंट, बँकिंग आणि आर्थिक तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या ४० हून अधिक उत्पादनांचा समावेश आहे.भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये ESOPs हे कर्मचाऱ्यांसाठी संपत्ती निर्मितीचे एक प्रमुख साधन बनत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

SCROLL FOR NEXT