Government Schemes: गुतंवणुकीचा विचार करताय का? या सरकारी योजना देतायेत बँक FD पेक्षा तगडा रिटर्न; जाणून घ्या

Government Schemes: सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर बदलते.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Government Schemes: सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर बदलते. एप्रिल-जून 2024 तिमाहीसाठी या लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेष बाब म्हणजे छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झाला नसतानाही सरकारी बँकांच्या एफडीच्या तुलनेत त्या अधिक चांगला परतावा देत आहेत. पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना गुंतवणूकदारांना 8.2 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहे. या व्यतिरिक्त, या सरकारी योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील देतात. आज आपण पोस्ट ऑफिसच्या 5 लहान बचत योजनांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्या बँक मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा देत आहेत.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेत त्यांचे खाते उघडू शकतात. या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवली जाऊ शकते. तसेच, गुंतवणूकदार वैयक्तिक आणि संयुक्त खाती उघडू शकतात. या योजनेत केवळ कर लाभच मिळत नाही तर नियमित उत्पन्नही मिळते. ही योजना 8.2 टक्के वार्षिक परतावा देत आहे. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, खात्यात किमान 1,000 रुपये असावेत तर कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे.

Money
7th Pay Commission: निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, 4 टक्क्यांच्या DA वाढीला दिली मंजूरी; HRA ही वाढला

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र हे भारत सरकारने जारी केलेले बचत प्रमाणपत्र आहे. ही योजना निश्चित व्याजदर आणि हमी परतावा देते. या योजनेत कोणताही कर लाभ नाही. KVP मधील गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के चक्रवाढ व्याज मिळते. विशेष म्हणजे गुंतवलेली रक्कम 115 महिने किंवा 9 वर्षे 7 महिन्यांत दुप्पट होते. या योजनेत किमान गुंतवणूक रु 1000 आहे तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळवण्याची संधी देते. यामध्ये किमान 1,500 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास त्याची कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला 80C अंतर्गत कर सवलत मिळत नाही. या योजनेत गुंतवणूकदारांना 7.4 टक्के वार्षिक परतावा मिळतो जो दरमहा दिला जातो.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, DA वाढीस मंजूरी; खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्येही गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. यासोबतच गुंतवणूकदाराला खात्रीशीर परतावाही मिळतो. या योजनेत गुंतवणूकदारांना (Investors) 7.7 टक्के चक्रवाढ व्याज मिळते, परंतु व्याजाची रक्कम मुदतपूर्तीनंतर मिळते. वैयक्तिक खात्याशिवाय तीन लोक संयुक्त खाते देखील उघडू शकतात. पालक अल्पवयीन मुलाच्या वतीने NSC खाते चालवू शकतात. योजनेअंतर्गत, किमान गुंतवणूक 1,000 आहे तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत कर सूटही मिळते.

Money
7th Pay Commission: दिवाळीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट? डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र हा भारतीय महिलांमध्ये बचत संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने सुरु केलेली एक सरकारी योजना आहे. मात्र, या योजनेत कोणताही कर लाभ नाही. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. ज्यामध्ये व्यक्तीच्या उत्पन्नाच्या (Income) स्लॅबच्या आधारे कर कपात केली जाते. या योजनेत गुंतवणूकदाराला 7.5 टक्के व्याज मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com