Gujarat Jamnagar Seat
Gujarat Jamnagar Seat Dainik Gomantak
देश

Gujarat Jamnagar Seat: रविंद्र जडेजाच्या पत्नीविरोधात बहिण उतरणार रिंगणात

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat Jamnagar Seat: गुजरातमधील जामनगर उत्तर या मतदारसंघातील निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे. गुरूवारीच भाजपने त्यांच्या 160 उमेदवारांची लिस्ट जारी केली होती. त्यात या मतदारसंघातून क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला उमेदवारी दिली आहे. पण आता येथून काँग्रेसकडून जडेजाची बहिण रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. (Gujarat Elections 2022)

रिवाबा जडेजा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांनी रविंद्र जडेजाची बहिण नैना हीनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नैना जडेजा या काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षदेखील आहेत.

जामनगरमध्ये सध्या भाजपचे धर्मेन्द्र सिंह जडेजा हे विद्यमान आमदार आहेत. ते येथून 2012 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2017 मध्ये त्यांनी येथून भाजपकडून विजय मिळवला. आता त्यांना तिकिट नाकारून भाजपने रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील लढत इंटरेस्टिंग झाली आहे. कारण येथून काँग्रेस नैना जडेजा यांना निवडणूक रिंगणात उतरवू शकते. त्यामुळे येथील लढत भाजप विरूद्ध काँग्रेस यापेक्षाही नणंद विरूद्ध भावजय अशी असणार आहे.

नणंद आणि भावजय यांच्यातील नातेसंबंधांवरून अनेक बातम्या समोर येत असतात. त्यात पतीची गोचीही होत असते. या लढतीतही क्रिकेटर रविंद्र जडेजा कुणाची बाजू घेणार, हा प्रश्न असणार आहे. बहिणीला साथ द्यायची की पत्नीला असा पेच रविंद जडेजासमोर असणार आहे. नैना जडेजा यांनी आईच्या निधनानंतर सर्व कुटूंबाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी रविंद जडेजाला क्रिकेटमध्ये सेटल होण्यासाठीही खूप मदत केली होती. तर रिवाबा या मुळच्या राजकोटच्या आहेत. त्यांचे वडील उद्योगपती आहेत. त्या करणी सेनेशीही संबंधित आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT