ravindra jadeja Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: लॉर्ड्सनंतर आता मँचेस्टर! 'सर' जडेजा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Ravindra Jadeja Milestone: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 अशा पिछाडीवर आहे.

Manish Jadhav

Ravindra Jadeja Milestone: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 अशा पिछाडीवर आहे. लॉर्ड्समध्ये 22 धावांनी पराभव पत्करल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीवर केंद्रित झाले आहे. या सामन्यात भारतीय संघाचा प्रयत्न केवळ पहिल्यांदाच या मैदानावर कसोटी जिंकण्याचा नाही, तर मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्याचाही असेल. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टॉप ऑर्डरसह मधल्या फळीतील फलंदाजांवर धावा करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. याचदरम्यान, अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) एक खास टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

रवींद्र जडेजाचे धमाकेदार फॉर्म

इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील चार डावांमध्ये सलग अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. आता त्याची नजर सलग पाचवे अर्धशतक झळकावण्यावर आहे. जर जडेजाने मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले, तर तो इंग्लंडमध्ये सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा पाहुणा फलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला केवळ 58 धावांची गरज आहे.

इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर जडेजा

सध्या इंग्लंडमध्ये (England) कसोटीत सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाच्या नावावर 942 धावा आहेत. या यादीत पाहुण्या फलंदाजांमध्ये केवळ गॅरी सोबर्स (1097 धावा) त्याच्या पुढे आहेत. यापूर्वी, लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावून जडेजाने स्टीव्ह वॉ आणि महेंद्रसिंग धोनीला मागे सोडले होते.

इंग्लंडमध्ये सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक कसोटी धावा करणारे पाहुणे फलंदाज:

  • गॅरी सोबर्स - 1097

  • रवींद्र जडेजा - 942

  • स्टीव्ह वॉ - 909

  • एम.एस. धोनी - 778

मँचेस्टरमध्ये जडेजावर असतील नजरा

जडेजाने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांतील 6 डावांमध्ये 109 च्या सरासरीने 327 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही चारही अर्धशतके सलग चार डावांमध्ये आली आहेत. आता मँचेस्टरमध्ये जडेजा हा पराक्रम पूर्ण करण्यात यशस्वी होतो की, त्याला पाचव्या आणि शेवटच्या कसोटीची वाट पाहावी लागेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT