
India vs England 4th Test
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी ५ कसोटी सामन्यांची मालिका खूपच रोमांचक होत आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने टीम इंडियाचा २२ धावांनी पराभव केला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ८ वर्षांनी इंग्लंड संघात एका धोकादायक वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन झाले आहे.
लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद सिराजला बाद करून इंग्लंडला विजय मिळवून देणारा शोएब बशीर या मालिकेतून बाहेर आहे. या कसोटी सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या डावात तो गोलंदाजी करायलाही येणार नव्हता, पण सामना हाताबाहेर जात असल्याचे पाहून कर्णधार बेन स्टोक्सने त्याला बोलावले. बशीरला गोलंदाजी देण्याचा निर्णय इंग्लंडसाठी योग्य ठरला. त्याने मोहम्मद सिराजला बाद करून भारताकडून विजय हिसकावून घेतला.
शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला इंग्लंड संघात समाविष्ट करण्यात आले आहे. लियाम डॉसन सुमारे ८ वर्षांनी इंग्लंडच्या कसोटी संघात परतला आहे. त्याने २०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. विशेष म्हणजे, लियाम डॉसनने २०१६ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
त्याने इंग्लंडसाठी जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्याने ३ कसोटी सामन्यांमध्ये ७ बळी घेतले आहेत. तर त्याने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ बळी घेतले आहेत. याशिवाय, त्याने १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने ११ बळी घेतले आहेत.
बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.