Manish Jadhav
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर पडला आहे.
रवींद्र जडेजाच्या अथक प्रयत्नांनंतरही तिसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवता आला नाही.
आता मालिकेतील चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवला जाणार आहे. हे मैदान टीम इंडियासाठी कधीही शुभ ठरले नाही.
ओल्ड ट्रॅफर्डवर भारताला आजपर्यंत एकाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
या मैदानावर भारताने 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 4 पराभव आणि 5 ड्रॉ आहेत, तर एकही विजय नाही.
ओल्ड ट्रॅफर्डचा हा खराब विक्रम पाहून चाहत्यांना भीती वाटतेय की, मालिका चौथ्या कसोटीतच हातातून निसटणार नाही ना.
लॉर्ड्समध्ये शुभमन गिल पूर्णपणे अपयशी ठरला, त्यामुळे ओल्ड ट्रॅफर्डमध्ये संघाची नौका पार करण्याची जबाबदारी कर्णधार गिलवरच असेल.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये शुभमन सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या सामन्यात टॉप ऑर्डरला कामगिरी करुन दाखवावी लागेल.