Ram Navami Wishes In Marathi Dainik Gomantak
देश

Ram Navami 2025: रामनवमीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, येथे आहेत एकापेक्षा एक सुंदर मेसेज

Ram Navami 2025 Wishes In Marathi: रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो.

Sameer Amunekar

Ram Navami Wishes in Marathi

रामनवमी (Ram Navami Wishes) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येतो. संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो, विशेषतः अयोध्या, नाशिक, रामटेक, आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

रामनवमी हा केवळ धार्मिक सण नाही तर तो धर्म, नीतिमत्ता आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात, त्यामुळे हा दिवस त्यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा आणि आचरणात आणण्याचा दिवस आहे.

रामनवमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये सजावट करुन महाप्रसादाचे आयोजन देखील करतात. काहीजण आजकाल मोठ्या प्रमाणात रामनवमीचा सण साजरा करत रामाची मिरवणूक देखील काढतात.

रामनवमीला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना रामनवमीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Ram Navami Wishesh) देऊ शकता.

रामनवमी शुभेच्छा संदेश Ram Navami Wishesh In Marathi

  • श्रीरामाचे नाव घ्या, दुःख तुमच्या पासून दूर जाईल,
    आयुष्यभर सुख-शांती लाभेल, रामनवमीच्या शुभेच्छा!

  • सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळो,
    रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  • श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो,
    जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • श्रीरामाची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
    आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो!

  • प्रभू श्रीराम तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान आणो,
    रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श आपल्या जीवनात येवो,
    रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!

  • रामनवमीच्या या पवित्र दिवशी,
    तुमचे जीवन आनंदाने फुलून जावो! जय श्रीराम!

  • रामाच्या नावात शक्ती आहे, रामाच्या नावात भक्ती आहे,
    रामनवमीच्या शुभ दिनी, तुम्हाला सुख-समृद्धी लाभो!

  • रामनवमीच्या पवित्र दिवशी,
    तुमचे जीवन आनंदाने आणि यशाने भरून जावो!

  • श्रीराम तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो,
    आरोग्य, आनंद आणि शांती लाभो! रामनवमीच्या शुभेच्छा!

  • रामनवमीच्या या पावन पर्वावर,
    प्रभू रामचंद्र आपल्याला चांगले विचार आणि सत्याचा मार्ग दाखवो!

  • सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या
    प्रभू श्रीरामाचा जयजयकार असो!

  • रामनवमीच्या शुभदिनी प्रभू श्रीराम आपल्याला
    सात्त्विक विचार आणि सद्गुणांनी परिपूर्ण जीवन द्यावो!

  • रामाच्या नांवात अशी ताकद आहे,
    जी संकटांवर मात करण्याची शक्ती देते! रामनवमीच्या शुभेच्छा!

  • श्रीराम तुमच्या घरात सुख, समाधान आणि भरभराटी आणो,
    रामनवमीच्या शुभेच्छा!

  • पन्हे पिऊन ताजेतवाने व्हा,
    रामाच्या कृपेने आयुष्य सुखकर करा! जय श्रीराम!

  • प्रभू श्रीरामाची कृपा सदैव तुमच्यावर राहो,
    जीवन आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरून जावो!

  • रामनामाचा जप करा, मन शांत आणि प्रसन्न राहील,
    रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो,
    जीवनात शुभ-समृद्धी लाभो! जय श्रीराम!

  • मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या परिवारावर राहो,
    रामनवमीच्या पवित्र शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India's 2nd Biggest Stadium: देशातील दुसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार; खर्च तब्बल 1650 कोटी, सरकारने केली घोषणा

Goa Assembly 2025: आता गोवा बनणार 'बीच स्पोर्ट्स टूरिझम हब'! सरकारची नवी योजना

Operation Sindoor: S-400 चा दणका! पाकिस्तानची 5 फायटर प्लेन पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा खुलासा, Watch Video

Train Ticket Discount: सणासुदीचा प्रवास होणार स्वस्त, रेल्वेकडून 'राउंड ट्रिप पॅकेज'; वाचा नेमकी योजना काय?

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT