Ram Mandir in Ayodhya  Dainik Gomantak
देश

Ram Mandir बाबत मोठी अपडेट! डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ‘हे’ काम; PM मोदींच्या उपस्थितीत...

Ram Mandir: अशा स्थितीत मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण होईल.

Manish Jadhav

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे काम वेगाने सुरु आहे. यातच आता, मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण होईल.

22 जानेवारीला अभिषेक सोहळा पार पडेल. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की, 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत धार्मिक विधी होणार आहेत.

आमच्या वतीने पीएमओला पत्र लिहिण्यात आले असून त्याचे उत्तरही मिळाले आहे. आता 22 तारखेला पंतप्रधान मोदी अयोध्येत (Ayodhya) येणार हे निश्चित झाले आहे.

नृपेंद्र मिश्रा यांनी पुढे असेही सांगितले की, मंदिराच्या शिखरावर बसवण्यात येणारे उपकरण तयार करण्याचे काम सुरु आहे, ज्याद्वारे प्रत्येक रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील देवतेवर सूर्याची किरणे पडतील. हे उपकरण बंगळुरुमध्ये बनवले जात आहे.

विशेष म्हणजे, त्याची डिझाइन शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली होत आहे. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी आणि पुण्यातील एका संस्थेने यासाठी एकत्रितपणे एक कार्यक्रम तयार केला आहे.

2019 मध्ये मंदिराच्या बांधकामाला न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला होता

दरम्यान, 2019 च्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अयोध्येतील वादग्रस्त जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला होता. याशिवाय, नवीन मशिदीच्या बांधकामासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.

16व्या शतकातील बाबरी मशीद ज्या वादग्रस्त जागेवर उभी होती ती 2.77 एकर जागा केंद्र सरकारकडे राहील आणि निकालानंतर तीन महिन्यांच्या आत मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येईल, असा निकाल न्यायालयाने दिला होता.

24 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले होणार का?

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट पंतप्रधान मोदींना अभिषेक सोहळ्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित करेल, ज्या दरम्यान भगवान रामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाईल.

मंदिर ट्रस्टने 14 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर राम लल्लाच्या अभिषेकाची प्रक्रिया सुरु करण्याचा आणि राम लल्लाच्या 'प्राण प्रतिष्ठा' (अभिषेक) चा 10 दिवसांचा विधी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी जूनमध्ये सांगितले होते की, अयोध्येतील राम मंदिर 24 जानेवारीला भगवान रामाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT