Ram Mandir: "21 सप्टेंबरला राम मंदिर उडवले जाईल," धमकीच्या फोनमुळे आयोध्येत खळबळ

Ram Mandir: राम मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एकाला अटक करुन चौकशी सुरू केली आहे.
"Ram temple will be blown up on September 21," a teenager in police custody who threatened.
"Ram temple will be blown up on September 21," a teenager in police custody who threatened.Dainik Gomantak
Published on
Updated on

"Ram temple will be blown up on September 21," a teenager in police custody who threatened:

अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आठवीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज येथील रहिवासी असलेल्या या मुलाने आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर कॉल केला.

पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये 21 सप्टेंबरला राम मंदिर उडवले जाईल, असे सांगण्यात आले होते. माहिती देण्यासाठी मी 112 वर फोन केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. एकाने यूपी 112 वर कॉल करून सांगितले की, 21 सप्टेंबरला अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीकडून याबाबत अधिक माहिती घ्यायची होती, मात्र त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com