Rakesh Tikait on Lakhimpur Kheri Issue BJP Workers death Dainik Gomantak
देश

त्यांचे मृत्यू म्हणजे 'एक्शन ची रिएक्शन' राकेश टिकैतांचे वादग्रस्त विधान

त्याचबरोबर आमचे आंदोलन सुरूच राहील असे देखील राकेश टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत (Lakhimpur Kheri Issue) वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की हिंसाचारात मारले गेलेले भाजप (BJP Workers) कार्यकर्ते ही 'एक्शन ची रिएक्शन' होती. राकेश टिकैत म्हणाले की ,मी भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूत असलेल्या शेतकऱ्यांना अपराधी मानत नाही कारण त्यांनी गर्दीत गाडी घातल्यानंतर आंदोलनकांनी असे पाऊल उचलेले आहे. (Rakesh Tikait on Lakhimpur Kheri Issue BJP Workers death)

"कारच्या ताफ्याने लखीमपूर खेरीमध्ये चार शेतकऱ्यांना तुडवले, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे दोन कार्यकर्ते ठार झाले. ती कृतीऐवजी प्रतिक्रिया होती. मी हत्येत सहभागी असलेल्यांना गुन्हेगार मानत नाही. "असे सप्ष्टीकरण राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना दिले आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, जोपर्यंत गृह राज्य मंत्र्याचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत तपास करता येणार नाही. गृह राज्यमंत्र्यांच्या विरोधात कोणताही अधिकारी प्रश्न उपस्थित करू शकतो का? मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे आहे. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही पुनर्विचार करू. आमचे आंदोलन सुरूच राहील असे देखील ते म्हणाले आहेत.

तसेच संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले, “लोकांच्या मृत्यूने आम्ही दु: खी आहोत, मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत किंवा शेतकरी. ही घटनाच दुर्दैवी होते आणि आम्हाला आशा आहे की न्याय मिळेल. ” शेतकरी नेत्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाला लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी अटक करण्याची मागणी केली. नेत्यांनी सांगितले की, ही घटना सुनियोजित कट होता.

योगेंद्र यादव म्हणाले की, अजय मिश्राला सरकारमधून काढून टाकले पाहिजे कारण त्यांनी हा कट रचला होता आणि तो या प्रकरणातील दोषींना संरक्षण देत आहेत . ते म्हणाले की 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याला एसकेएम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पुतळे जाळून निषेध करेल असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला काल अटक झाली आहे. आशिष मिश्राची एसआयटी टीमने सुमारे 12 तास चौकशी केली होती सखोल प्रश्नोत्तरानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत म्हणून त्यांना अटक करण्यात अली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT