Lakhimpur Kheri Case: अखेर आशिष मिश्रा क्राईम ब्रँचमध्ये दाखल

लखीमपूर खेरी हिंसाचारातील (Lakhimpur Kheri Case) मुख्य आरोपी आशिष मिश्राआता गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलिसांसमोर हजर झाले आहेत .
Lakhimpur Kheri Case: Ashish Mishra in CBI Office
Lakhimpur Kheri Case: Ashish Mishra in CBI OfficeTwitter @ANI
Published on
Updated on

लखीमपूर खेरी हिंसाचारातील (Lakhimpur Kheri Case) मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) आता गुन्हे शाखेच्या (CBI) कार्यालयात पोलिसांसमोर हजर झाले आहेत . आता आशिषची शेतकऱ्यांच्या मृत्यू (Farmer Protest) संदर्भात चौकशी होणार आहे . आशिष मिश्रा यांचे कायदेशीर सल्लागार अवधेश कुमार म्हणाले की, आम्ही नोटीसचा सन्मान करू आणि तपासात नक्कीच सहकार्य करू. आशिष मिश्रा आज पोलिसांसमोरही हजर होणार आहे. यूपी पोलिसांनी आशिष मिश्रा यांना लखीमपूर प्रकरणी समन्स बजावले होते . (Lakhimpur Kheri Case: Ashish Mishra in CBI Office)

काल रात्री उशिरा गृह राज्यमंत्री अजय मिश्रा देखील लखीमपूर खेरी येथील त्यांच्या घरी पोहोचले होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी शुक्रवारी त्यांचा मुलगा आशिषचा बचाव केला होता. या प्रकरणावर बोलताना माझा मुलगा कुठेही गेला नाही, तो शाहपुरा येथील त्याच्या कोठीमध्ये आहे.असे स्पष्टीकरण दिले होते. त्याचबरोबर त्यांनी जर इतर राजकीय पक्ष असते तर मी ज्या पदावर आहे असे असते तर इतरांनी कुणीही मुलाच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवला नसता. आम्ही या प्रकरणी एफआयआर नोंदवू आणि कारवाई देखील करू.असे मत देखील व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या वेशात ज्या पद्धतीने बदमाशांनी लोकांना मारहाण केली आहे, जर तुम्ही लोकांनी व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचाही विश्वास असेलच की जर माझा मुलगाही तिथे असता तर त्याची आतापर्यंत हत्या झाली असती.

त्याचबरोबर आता या प्रकरणी सरकारने काही वेळ मागितला आहे आणि 18 ऑक्टोबरला सुनावणी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तुम्ही इतर लोकांशी ज्या प्रकारे वागता, त्याच पद्धतीने तुम्ही वागले पाहिजे. सीजेआयने सांगितले की या प्रकरणात हा संदेश लोकांपर्यंत जात आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी 23 ऑक्टोबरला करणार आहे.

Lakhimpur Kheri Case: Ashish Mishra in CBI Office
Mumbai Raid: NCB ची कारवाई 'फर्जी', नवाब मालिकांचा आरोप

दुसरीकडे विरोधक या प्रकारणांनंतर सरकारवर सतत हल्ला चढवत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी न दिल्याने सरकारवर जोरदार टीका करत होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारला पोलिसांच्या बळावर राज्य चालवायचे आहे.त्याचबरोबर. अखिलेश यादव यांनी लखीमपूर खेरी हिंसाचाराचे व्हिडिओ बाहेर येऊन आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवूनही सरकार न्यायाला विलंब का करत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com