Rahul Gandhi alleges that women MPs were beaten in rajya sabha Dainik Gomantak
देश

Video: राज्यसभेत राडा; महिला खासदारांना मारहाण झाल्याचा राहुल गांधींचा आरोप

Rajya sabha ruckus: 'माझ्या 55 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आज राज्यसभेत ज्या प्रकारे महिला खासदारांवर हल्ला झालेला मी पाहिला नाही', असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

संसदेचे पावसाळी अधिवेशन अचानक संपल्यानंतर सभागृहातील काही महिला खासदारांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या विरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी गुरुवारी सकाळी संसदेबाहेर निदर्शनं केली. यावेळी बोलताना राहुल गांधी माध्यमांना उद्देशुन म्हणाले की, ‘आज आम्ही तुमच्याशी बोलण्यास आलो आहोत, कारण आम्हाला सभागृहात बोलु दिले गेले नाही. ही लोकशाहीची 'हत्या' आहे.’ (Rahul Gandhi alleges that women MPs were beaten in rajya sabha)

हा लोकशाहीवर हल्ला: शरद पवार

माझ्या 55 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आज राज्यसभेत ज्या प्रकारे महिला खासदारांवर हल्ला झालेला मी पाहिला नाही. 40 पेक्षा जास्त स्त्री -पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, संसदेचे अधिवेशन संपले आहे पण देशाच्या 60 टक्के लोकांचा आवाज काल राज्यसभेत पायदळी तुडवला गेला, महिलांवर झालेल्या तथाकथित हल्ला प्रकरणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा अपमान करण्यात आला आणि शारीरिक मारहाण करण्यात आली.

पाकिस्तान सीमेवर उभे असल्यासारखे वाटते: संजय राऊत

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 'विरोधकांना संसदेत आपले विचार मांडण्याची संधी मिळाली नाही. बुधवारी महिलांविरोधात घडलेली घटना लोकशाहीच्या विरोधात आहे, असे वाटत होते की आम्ही पाकिस्तान सीमेवर उभे आहोत.’

यापूर्वी बुधवारी राज्यसभेच्या विरोधी खासदारांनी सभागृहात विमा विधेयक मांडताना या घटनेसाठी केंद्र सरकारला लक्ष्य केले. राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी सरकारविरोधात निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद भवनातील बैठकीनंतर संसद भवना ते विजय चौकपर्यंत पायी पदयात्रा काढली. यावेळी अनेक नेत्यांनी बॅनर आणि फलक दाखवत निदर्शनं केली.

राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी सरकारविरोधात निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसद भवनातील बैठकीनंतर संसद भवना ते विजय चौकपर्यंत पायी पदयात्रा काढली. यावेळी अनेक नेत्यांनी बॅनर आणि फलक दाखवत निदर्शनं केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT