Rajya Sabha ruckus: BJP slams on Opposition Dainik Gomantak
देश

सरकारचे 8 मंत्री,पत्रकार परिषद आणि राज्यसभेच्या गोंधळांनंतर विरोधकांवर टीकास्त्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session ) शेवटच्या दिवशी राज्यसभेत (Rajyasabha) झालेल्या गोंधळावरून सरकार आणि विरोधकांमधील युद्ध सुरूच आहे.

दैनिक गोमन्तक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session ) शेवटच्या दिवशी राज्यसभेत (Rajyasabha) झालेल्या गोंधळावरून सरकार आणि विरोधकांमधील युद्ध सुरूच आहे. गुरुवारी विरोधकांनी प्रथम मोर्चा काढून सरकारला लक्ष्य केले आणि आता सरकारने विरोधकांवर टीका केली आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करावी आणि विरोधी खासदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडून केली जात आहे.(Rajya Sabha ruckus: BJP slams on Opposition)

अगोदर सरकारला घेरण्यासाठी जवळपास 12 विरोधी पक्ष एकवटलेले पाहायला मिळाले तर आत आता सरकार मधील तब्ब्ल आठ बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गुरुवारी दुपारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal), प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi ), मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi), धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), भूपेंद्र यादव (Bheupendra Yadav), अनुराग ठाकूर(Anurag Thakur), अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. याच पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी रस्त्यापासून संसदेपर्यंत अराजक पसरवले असून संपूर्ण विरोधकांनी देशाची माफी मागावी.

या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांवर 8 आरोप करत हल्ला चढवला आहे.

  • विरोधकांनी आधीच अधिवेशन उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यांनी सभागृहात कामकाज चालूच दिले नाही.

  • सरकार कोरोना, महागाई, कृषी विधेयकावर चर्चा करण्यास तयार होते, मात्र विरोधी पक्ष पेगाससवर ठाम राहिले.

  • 2004 ते 2014 पर्यंत यूपीए सरकारने चर्चा न करता डझनभर विधेयके पास केली पण आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

  • निलंबित करण्यात आलेल्या 6 खासदारांना काचा फोडून संसदेत प्रवेश करायचा होता. यादरम्यान महिला मार्शलला दुखापत झाली आहे.

  • ऑगस्ट रोजी टेबलावर गोंधळ झाला, नियम पुस्तक खुर्चीच्या दिशेने फेकण्यात आले, तो एक खुनी हल्ला होता.

  • विरोधी पक्षाच्या महिला खासदारांची लेडी मार्शलशी बाचाबाची झाली, हे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट होते.

  • बाहेरचे कोणतेही सुरक्षा कर्मचारी आले नाहीत, फक्त संसदेचे 30 सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

  • विरोधक फक्त स्वतः बोलताना आणि विभाजन करताना शांत राहिलले, उर्वरित वेळी मात्र सनदेत गोंधळ झाला आणि खुर्चीचा अपमान झाला.

केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधक आधीच अधिवेशन बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आम्ही विरोधकांना चर्चेचे आवाहन केले होते, तसेच मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी शांत राहण्याचे आवाहन केले होते. महागाई, कोरोना संकट, शेतीविषयक समस्यांवर चर्चेसाठी सरकारक मंजुर होते मात्र विरोधकांना हे मान्य नव्हते केंद्रीय मंत्री म्हणाले की, 2004 ते 2014 पर्यंत यूपीएच्या कार्यकाळात अशी अनेक विधेयके होती जी कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. विरोधकांकडून सरकारवर चर्चा होत नसल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे.

राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पियुष गोयल म्हणाले की, राज्यसभेत विरोधकांच्या वर्तणुकीमुळे संपूर्ण सभागृहाच्या सन्मानाला धक्का बसला आहे. विरोधकांना कोणत्याही प्रकारे सभागृह चालवूच द्यायचे नव्हते.पियुष गोयल म्हणाले की, 9 ऑगस्टला विरोधकांनी गोंधळ घातला, नियम पुस्तक खुर्चीच्या दिशेने फेकले गेले. विरोधी पक्षनेत्याने खुर्चीवर खुनी हल्ला केल्याचा आरोप पीयूष गोयल यांनी केला आहे . तसेच महिला मार्शलला विरोधी पक्षाच्या खासदारांनी मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT