Rajat Patidar Dainik Gomantak
देश

India vs South Africa: 5 सामन्यांत 2 शतके, 1 द्विशतक...! श्रेयस अय्यरची जागा घेणार विराटचा पठ्ठ्या? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाडणार छाप

Rajat Patidar Replace To Shreyas Iyer: अय्यरला पुढील काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला मैदानावर परतण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

Manish Jadhav

Rajat Patidar Replace To Shreyas Iyer: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर स्प्लीनमध्ये झेल घेताना दुखापतग्रस्त झाला, ज्यामुळे त्याला तात्काळ सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरला पुढील काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला मैदानावर परतण्यासाठी काही वेळ लागू शकतो. टीम इंडियासाठी ही खूपच वाईट बातमी आहे, विशेषत: पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर ही दुखापत चिंताजनक आहे. अय्यरच्या अनुपस्थितीमुळे निवड समितीसमोर आता नवा पर्याय शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

अय्यरच्या जागी कोण?

श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर (Number 4) फलंदाजी करतो आणि त्याचा रेकॉर्डही अत्यंत दमदार आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये दबावाखाली उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. मात्र, दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका मालिकेतून जवळपास बाहेरच मानला जात आहे. त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांचे लक्ष आता एका नवीन चेहऱ्यावर केंद्रित झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशचा स्टार फलंदाज रजत पाटीदार याला अय्यरच्या जागी वनडे संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

रजत पाटीदारची दमदार कामगिरी

दरम्यान, 32 वर्षीय रजतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे तो राष्ट्रीय संघासाठी एक मजबूत दावेदार बनला आहे. रजतने आयपीएल 2025 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली आरसीबीला (RCB) पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवले. यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने मागील 4 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 2 शतके आणि 1 द्विशतक ठोकले आहे, याव्यतिरिक्त दोन अर्धशतकांचाही यात समावेश आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली सेंट्रल झोन संघाला 11 वर्षांनंतर दलीप ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवून दिले.

रजतचा आंतरराष्ट्रीय अनुभव

रजत पाटीदारने टीम इंडियासाठी (Team India) यापूर्वी 3 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आहे. कसोटीत त्याने 6 डावांत केवळ 63 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच आपला एकमेव वनडे सामना खेळला होता, ज्यात त्याने 22 धावा करुन आपली विकेट गमावली होती. जर पाटीदारला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली, तर त्याच्या कारकिर्दीसाठी ही एक मोठी आणि निर्णायक संधी ठरु शकते. निवड समिती लवकरच अय्यरच्या बदली खेळाडूची घोषणा करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT