Accident News Dainik Gomantak
देश

Accident News: चालकाला झोप लागली अन् होत्याचे नव्हते झाले! खाटूश्यामजीच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास ठरला शेवटचा; भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू

Kota Udaipur Highway Accident 9 Death: राजस्थानातून धडकी भरवणारी बातमी समोर आली. येथील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Kota Udaipur Highway Accident 9 Death: राजस्थानातून धडकी भरवणारी बातमी समोर आली. येथील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. नाता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ पहाटे एकच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव क्रूझरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आणि या धडकेत क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत लहान मुलांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चालकासह आठ जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी खाटूश्यामचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतीच्या प्रवासावर होते. तीन वाहनांमधून एकूण 36 नातेवाईक एकत्र प्रवास करत होते; मात्र सर्वात पुढे असलेल्या क्रूझरला हा अपघात झाला. चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात (Accident) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; प्रवासादरम्यान त्याला थांबून चहा घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता. अपघातानंतर प्रवासी गाडीतच अडकले होते, त्यांना गाडी कापून बाहेर काढावे लागले.

जखमींना तातडीने न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सिटी एसपी तेजस्वनी गौतम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

उषा बाई, सुशीला (55), कैलास (45), सांवी, सज्जन, अनीता, बाबूलाल (60), जान्हवी (13) आणि माधवी अशी मृतांची नावे आहेत. तर जगदीश (10), मयूरी पवार (20), मनीषा पवार (45), शरद पवार (46), गणेश पवार (30), सृजेत (3) आणि हारुन (43) हे जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील खंडवा येथील ट्रकचालक हारुन याने सांगितले की, ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्याने वाहन कडेला उभे केले होते. तो मागून तपासणी करत असतानाच क्रूझरने धडक दिली आणि तो सुमारे वीस फूट दूर फेकला गेला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनीच त्याला रुग्णालयात हलवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राजकीय संन्यास सोडून मनोज परब पुन्हा मैदानात; 'आरजी'तील परब-बोरकर संघर्षाला नवे वळण

खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

Mexico Violence: ड्रग माफियाच्या अटकेनंतर रक्तरंजित धुमश्चक्री, अंदाधुंद फायरिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू; मेक्सिकोत गुन्हेगारी टोळीचा हैदोस!

Crime News: आसगाव प्रकरणाची पुनरावृत्ती? आश्वे-मांद्रेतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Goa Politics: काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 40 मतदारसंघांत अर्ज मागवले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; चोडणकरांनी स्पष्टच सांगितले

SCROLL FOR NEXT