Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime: शनिवारची ती भयानक रात्र! 17 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; प्रियकराला मारहाण करुन...

Rajasthan Crime: राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका 17 वर्षीय दलित मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Rajasthan Crime: राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका 17 वर्षीय दलित मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. दलित तरुणी तिच्या प्रियकरासोबत जोधपूरला पोहोचली होती, तिथे आरोपींनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने सोबत नेले.

घटनास्थळी पोहचल्यानंतर आधी प्रियकराला या नराधमांनी मारहाण केली आणि नंतर एकामागून एक मुलीवर बलात्कार केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच काही तासांतच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच अभाविपच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. मात्र, एबीव्हीपीने आरोपींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी डीजीपी उमेश मिश्रा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या गृहजिल्ह्यात असा गुन्हा घडल्यानंतर सीएम गेहलोत यांनी डीजीपीशी बोलून आरोपींवर कडक कारवाई करण्यास सांगितले.

सीएम गेहलोत म्हणाले की, पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपींना अटक केली ती वाखाणण्याजोगी आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

बॉयफ्रेंडसोबत जोधपूरला गेली होती

जोधपूर पूर्व पोलिस उपायुक्त अमृता दुहान यांनी सांगितले की, पीडित तरुणी तिच्या प्रियकरासह अजमेरहून पळून जोधपूरला पोहोचली होती. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास दोघेही जोधपूरला पोहोचले होते.

इथे त्यांना रात्र घालवण्यासाठी गेस्ट हाऊसची गरज होती. त्यांनी एका गेस्ट हाऊसमध्ये जाऊन रुम मागितली असता तेथील केअरटेकर सुरेश जाट याने मुलीचा विनयभंग केला.

तीनही आरोपी सापडले

गेस्ट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर पीडिता आणि तिचा प्रियकर शहरातील पाओटा क्रॉसिंगवर पोहोचले. येथे त्यांची समंदर सिंग भाटी, धरमपाल सिंग आणि भट्टम सिंग यांची भेट झाली. तिघांचेही वय 20 ते 22 वर्षे आहे.

डीसीपींनी सांगितले की, आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराशी मैत्री केली आणि त्यांना जेवण दिले. पीडितेने तिन्ही आरोपींना (Accused) स्वतःबद्दल आणि तिच्या प्रियकराबद्दल सांगितल्यावर त्यांनी दोघांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले.

स्टेशनवर सोडण्याचा बहाणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत करण्याच्या नावाखाली तीन आरोपी रविवारी पहाटे 4 वाजता पीडितेला आणि तिच्या प्रियकराला रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या बहाण्याने थेट जय नारायण व्यास विद्यापीठाच्या हॉकी मैदानावर नेले. येथे त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण करुन ओलीस ठेवले. यानंतर त्यांनी पीडितेवर एकामागून एक बलात्कार केला.

लोकांकडून मदत मागितली

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पाहून तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन तात्काळ पळ काढला. पीडितेच्या प्रियकराने लोकांना पाहिल्यानंतर त्यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांना या घटनेविषयी माहिती देण्यात आली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पीडितेची तक्रार ऐकून घेतली. पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीमलाही घटनास्थळी पाचारण केले.

भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे, तर विरोधी पक्षाने आरोपी भाजपच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले आहे की, या प्रकारात त्यांचे कोणतेही विधान समोर आले नाही, यावरुन भाजप महिलांवरील गुन्ह्यांबाबत किती जागरुक आहे हे दिसून येते. दुसरीकडे, भाजपने तिन्ही आरोपी अभाविपशी संबंधित असल्याचं प्रकरण पूर्णपणे बाजूला सारलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT