Crime News Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime: क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन जिवंत जाळले

Rajasthan Crime: राजस्थानमधील भिलवाडा येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आले.

Manish Jadhav

Rajasthan Crime: राजस्थानमधील भिलवाडा येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना पीडितेची चांदीची बांगडी भट्टीजवळ दिसली असता ती जाळल्याचा संशय आला.

याबाबत त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, त्यानंतर तिला भट्टीत जाळण्यात आले.

भट्टीजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडेही सापडले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटकही केली आहे. सध्या पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. इकडे गावात राहणारी 12 वर्षीय निरागस मुलगी शेळ्या चरण्यासाठी शेतात गेली होती. त्यानंतर मुलगी घरी परतलीच नाही.

खूप वेळ तिची वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिचा शोध घेत ते शेतात पोहोचले असता त्यांना वीटभट्टीत भट्टी जळत असल्याचे दिसले. भट्टीजवळ पाहिले असता कोळशाच्या राखेत मुलीची चांदीची बांगडी दिसली.

भट्टीजवळ शरीराचे अवयव सापडले

दरम्यान, भट्टीतून मुलीच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले. जवळच्या लोकांकडे चौकशी केली असता मुलीला बलात्कारानंतर जाळल्याचे प्रकरण समोर आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

ही बाब पोलिसांच्या (Police) निदर्शनास येताच एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तपास पथकालाही पाचारण करण्यात आले. जिथून मुलीच्या हातातील ब्रेसलेट आणि मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत.

शेताच्या बाजूला अनेक शेळ्या चरत होत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता शेळ्या चरण्यासाठी शेताच्या दिशेने गेली होती. मुलगी सकाळी घरातून शेताकडे निघाली होती, मात्र सायंकाळी 4 वाजेपर्यंत ती न परतल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मुलीचा (Girl) शोध घेण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण गावात तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. गावाबाहेर भट्टी जळत असल्याचे दिसल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला. 4-5 मुलांवर सामूहिक बलात्कार करुन खून झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT