Baba Balak Nath Controversial Statement  Dainik Gomantak
देश

Rajasthan Assembly Election 2023: 'यंदाची निवडणूक भारत-पाकिस्तान सामन्यासारखी...', BJP खासदाराचं वक्तव्य

Rajasthan Assembly Election 2023: भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबा बालकनाथ हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात.

Manish Jadhav

Rajasthan Assembly Election 2023: भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबा बालकनाथ हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे एक वादग्रस्त विधान पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते विधानसभा निवडणुकीची तुलना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याशी करत आहेत. यामध्ये ते सभेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलले ते म्हणाले की, ही निवडणूकही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यासारखी आहे, आता तुम्ही भारताच्या बाजूने आहात की पाकिस्तानच्या बाजूने आहात.

अलवरच्या तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार

दरम्यान, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. याच क्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार बालकनाथ यांना अलवरच्या तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बालकनाथ हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान असे वादग्रस्त वक्तव्य केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विधानसभा निवडणुकीची तुलना सामन्याशी केली

बालकनाथ एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी टपुकडा येथे पोहोचले होते. जिथे जवळपास 200 लोक उपस्थित होते. जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 'यावेळची विधानसभा निवडणूक भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यासारखी आहे. इथे हा विजय-पराजय नसून मतदानाच्या टक्केवारीचा लढा आहे. मतदानाची टक्केवारी किती आहे हे सांगण्याची गरज नाही. यावेळी आम्हालाही त्यांच्यापेक्षा जास्त मतदान करायचे आहे, तिथे हे सर्व लोक एकत्र आले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT