Indian Railways latest news Dainik Gomantak
देश

Railway Rules Changed: रेल्वेचा मोठा निर्णय!तात्काळ बुकिंगचे नियम बदलले, OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य; वाचा पूर्ण माहिती

Tatkal Booking New Rules: तात्काळ ट्रेन तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे

Akshata Chhatre

IRCTC Tatkal Changes: तुम्ही जर IRCTC च्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून तात्काळ ट्रेन तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या बुकिंगमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे.

आता आधार OTP पडताळणी बंधनकारक

या नवीन नियमानुसार, तात्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी तुमच्या मोबाइल नंबरवर OTP येईल आणि हा OTP टाकल्याशिवाय बुकिंग पूर्ण होणार नाही. याचा अर्थ असा की, आता आधार पडताळणी शिवाय तात्काळ तिकीट बुक करणे शक्य होणार नाही. रेल्वेने तात्काळ बुकिंगची वेळ उघडताच एजंट्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काही सेकंदात डझनभर तिकिटे बुक करून घेतात, या एजंटराजला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्य प्रवाशांना मिळणार संधी

या नव्या प्रणालीमुळे एसी क्लाससाठी सकाळी १० ते १०.३० आणि स्लीपर क्लाससाठी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत एजंट्सना तिकीट बुक करता येणार नाहीत. ही वेळ आता केवळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी असेल, ज्यामुळे त्यांनाही कन्फर्म तिकीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.

जर तुम्ही अजूनही तुमच्या IRCTC खात्याशी आधार क्रमांक लिंक केला नसेल, तर तो ताबडतोब करून घ्या. कारण, तिकीट बुक करताना तुमच्या खात्यात आधार लिंक नसल्यास, OTP प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि तुमचे तिकीट बुकिंग रद्द होऊ शकते. यापूर्वी, तिकीट बुक करताना OTP येत नव्हता, ज्यामुळे एजंट्स गैरफायदा घेत होते. पण, आता रेल्वेने प्रवासी आरक्षण प्रणालीत तांत्रिक बदल करून आधार OTP पडताळणी बंधनकारक केली आहे.

देशभरात लागू, काउंटरवरही नियम बदलणार

ही नवी प्रणाली भारतातील सर्व रेल्वे झोनमध्ये लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळीकडे तात्काळ तिकिटे केवळ आधार OTP द्वारेच बुक केली जातील. रेल्वे स्टेशनवर जाऊन काउंटरवरून तिकीट बुक करत असाल, तर तिथेही हा नियम लागू होईल.

काउंटरवरून बुकिंग करताना तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल आणि OTP पडताळणी करावी लागेल. तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक झाल्यावरच तिकीट बुक केले जाईल. त्यामुळे, तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी आधार आणि मोबाइल एकमेकांशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तिकीट बुक करत असाल, तर त्यांचा आधार नंबर आणि OTP देखील लागेल.

रेल्वेने स्पष्ट केले आहे की, हा नवीन नियम केवळ तात्काळ तिकीट बुकिंगसाठी हे. सामान्य तिकिटे किंवा प्रतीक्षा यादीतील तिकिटांसाठी आधारची आवश्यकता नाही. मात्र, येत्या काळात हीच प्रक्रिया काउंटरवरून बुक केलेल्या इतर तिकिटांनाही लागू केली जाऊ शकते.

तुम्हाला OTP मिळत नसेल किंवा आधार लिंक करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही IRCTC हेल्पलाइन १३९ किंवा UIDAI हेल्पलाइन १९४७ वर कॉल करू शकता, किंवा जवळच्या रेल्वे स्थानकाच्या आरक्षण काउंटरवर जाऊन मदत मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

'It's Family Matter', आमदार कार्लुस फेरेरा यांच्या तक्रारीबाबत बोलण्यास खासदार विरियातो यांचा नकार Video

SCROLL FOR NEXT