Satyendra Kumar Jain Dainik Gomantak
देश

सत्येंद्र जैन यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर छापा; कोट्यवधींची रोकड जप्त

अंमलबजावणी संचालनालय ने सात ठिकाणी हे छापे मारले आहेत.

दैनिक गोमन्तक

केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत यातच आज ईडीने सत्येंद्र जैन सहकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये ईडीच्या हाती कोट्यवधींची रोकड आणि दागिने लागले. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने तब्बल सात ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटींची रोकड सापडल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरा सहकारी वैभव जैन याच्याकडे 41.5 लाख रोख 133 सोन्याची नाणी देखील मिळाली आहेत. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडल्याचे सांगण्यात येत आहे. (Raids on the house of Health Minister Satyendra Jain colleagues Billions in cash confiscated)

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही छापेमारी केली आहे. हे छापे सत्येंद्र जैन-पूनम जैन आणि त्यांचे सहकारी तसेच या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित लोकांवर देखील टाकण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन आणि सिद्धार्थ जैन यांचा देखील समावेश आहे.

दुसरीकडे, जीएस मथारू आणि अन्य काही जणांवरही ही EDने मोठी कारवाई केली आहे. झडतीदरम्यान विविध गुन्ह्यांचे दाखले आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT