Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

10 दिवसांत 9व्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेजारील देशांमध्ये पेट्रोलच्या किंमती शेअर करत मोदी सरकारवर साधला निशाना

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षाच्या अनेक खासदारांनी गुरुवारी संसदेजवळ धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे सर्व बडे नेते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या 'महागाईमुक्त भारत' मोहिमेचा एक भाग म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सुमारे दीड तास आधी पक्षाच्या खासदारांनी विजय चौकात धरणे धरले. त्यानंतर राहुल गांधी यांनी शेजारील देशांमध्ये पेट्रोलच्या किंमती शेअर करत मोदी सरकारवर साधला निशाना आहे.

तसेच 10 दिवसांत 9व्यांदा पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात वाढ केल्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) महागाई धोरणावर टीका केली आहे. त्यांनी यावेळी देशाच्या शेजारील राष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दर किती आहेत आणि आपल्या देशात कशी वाढ होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेजारील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती शेअर करताना अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पेट्रोलची किंमत 66.99 रुपये आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) 62.38 रुपये असल्याचा दावा केला आहे. तसेच श्रीलंकेत 72.96 रुपये, बांगलादेशमध्ये 78.53 रुपये, भूतानमध्ये 86.28 रुपये आणि नेपाळमध्ये 97.05 रुपये असल्याचा दावा केला आहे.

तसेच राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥ असे हिंदीमध्ये लिहीत मोदी सरकारवर टीका केली आहे. तर त्यांनी याच्याआधी २२ मार्चला त्यांच्या एका दुसऱ्या ट्वीटमध्ये गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागू करण्यात आलेला 'लॉकडाऊन' (Lockdown) उठवण्यात आल्याचे म्हटले होते. तर आता सरकार दर सातत्याने 'विकास' करणार करेल, वाढत जाणार्या या महागाईबाबत पंतप्रधान यांना विचारा, तर ते सांगतील #ThaliBajao असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT