Election Commission On Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Election Commission: 'एच-फाईल्स'चा फुगा फुटला? निवडणूक आयोगाने फेटाळले राहुल गांधींचे आरोप; म्हणाले, 'प्रतिज्ञापत्र द्या, नाहीतर...'

Election Commission On Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीवरुन निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत.

Manish Jadhav

Election Commission On Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीवरुन निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणुकीत 'व्होट चोरी' झाली असून 25 लाखांहून अधिक बनावट मतदार दाखवल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे 'एच-फाईल्स' नावाचे हे सर्व आरोप "खोटे आणि बिनबुडाचे'' ठरवून फेटाळून लावले. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी हरियाणा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा जो दावा केला त्यासंबंधीचे ठोस पुरावे त्यांनी किंवा काँग्रेस पक्षाने दिले नाहीत.

राहुल गांधींचे तीन मुख्य आरोप

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत 'एच-फाईल्स' (Hydrogen Bomb) नावाचे कागदपत्र दाखवून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. हरियाणात पाच लाखांपेक्षा जास्त बनावट मतदार आहेत. 1,24,177 मतदारांसाठी एकाच व्यक्तीचा फोटो वारंवार वापरला गेला. एकाच मतदारसंघात 10 मतदान केंद्रांवर तब्बल 22 वेगवेगळ्या मतदारांसाठी एका ब्रझीलियन मॉडेलचा फोटो वापरला गेला. मोठ्या इमारतीत राहणाऱ्यांसाठीही घराचा क्रमांक '0' (शून्य) असलेला मतदार नोंदवला गेला, असे आरोप त्यांनी केले.

निवडणूक आयोगाचे स्पष्ट उत्तर

मात्र, राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने सडेतोड उत्तर दिले. आयोगाने म्हटले की, 'हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. त्यांचे हे आरोप देशाच्या लोकशाही संस्थांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.'

निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना मतदार यादीची दुरुस्ती करताना आपल्या बूथ-स्तरीय एजंट्सद्वारे आक्षेप नोंदवण्याची संधी दिली होती. पण काँग्रेस पक्षाने त्यावेळी कोणतेही आक्षेप नोंदवले नाहीत. ज्या घरांना अधिकृतरित्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा क्रमांक दिलेला नसतो, त्या घरांना '0' (शून्य) क्रमांक देण्याची सामान्य सरकारी पद्धत आहे. हा काही घोटाळा नाही, असेही आयोगाने पुढे म्हटले.

आयोगाने राहुल गांधींना त्यांच्या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र (Affidavit) दाखल करण्याची मागणीही केली, परंतु राहुल गांधींनी अद्याप ते दाखल केलेले नाही. आयोगाने स्पष्ट केले की, त्यांच्या सार्वजनिक भाषणांना केवळ त्यांचे 'शब्द' मानले जाईल.

राजकारण तापले

गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरुन देशात मोठी राजकीय वादावादी सुरु आहे. भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका करत त्यांना 'बाहेरील शक्तींच्या' हातातील बाहुले म्हटले. तर काँग्रेसने आरोप केला की, 'निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला निवडणुकीत मदत करतो.' मात्र आता, निवडणूक आयोगाने पुरावे मागितल्यामुळे राहुल गांधी त्यांच्या 'एच-फाईल्स'मधील दाव्यांना सिद्ध करण्यासाठी काय पाऊल उचलतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

Mangal Gochar 2026: धरतीपुत्र मंगळाची वक्रदृष्टी! 'या' 3 राशींना बसणार मोठा फटका; आर्थिक चणचण अन् मानसिक ताण वाढणार

IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

8th Pay Commission: सावधान! पगार वाढीच्या आमिषाला बळी पडू नका, WhatsApp वर फिरतोय 8व्या वेतन आयोगाचा 'फेक' मेसेज; गृह मंत्रालयाचा अलर्ट

गुन्हेगारांना कायद्याचा धाक! नव्या न्याय संहितांच्या अंमलबजावणीत गोवा देशात अग्रस्थानी; DGP आलोक कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT