Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: सुरत सत्र न्यायालयाच्या शिक्षेला राहुल गांधी देणार आव्हान; कॉंग्रेस नेत्यांच्या गाड्या...

Rahul Gandhi: देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi: कॉंग्रेस नेता राहुल गांधी आज सुरत सत्र न्यायालयात मानहानी प्रकरणात त्यांना दिलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार आहे. याबरोबरच रेग्युलर बेलसाठीदेखील अर्ज दाखल करणार असल्याची माहीती मिळाली आहे.

राहुल गांधी सुरत न्यायालयात जाण्याआधी कॉंग्रेस नेता प्रियंका गांधी आणि सोनिया गांधीनींदेखील त्यांची भेट घेतली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल आणि हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हेदेखील राहुल गांधीबरोबर न्यायालयात हजर राहणार आहेत. यानेत्यांसोबत अनेक दिग्गज नेते यावेळी न्यायालयात राहुल गांधींच्या समर्थनार्थ हजर राहणार आहेत.

13 एप्रिल 2019 मध्ये राहुल गांधींनी एका रॅलीदरम्यान नीरव मोदी, ललीत मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का असते? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री यांनी पूर्णेश मोदींनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत आपराधिक मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

मानहानीच्या प्रकरणावर सुनावणी देताना सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर देशात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता.

दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ अनेक नेते सुरत न्यायालयात हजर राहत आहेत. मात्र कॉंग्रेस नेत्यांच्या गाड्यांची तपासणी करत चौकशी करुन गाड्या पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे. याप्रकारावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. आता न्यायालयात राहुल गांधींचा जामीन मंजूर केला जाणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT