Kerala Train Fire: भयंकर! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; 3 जणांचा मृत्यू

रेल्वेकडुन मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये चढण्यावरुन झालेल्या भांडणामुळे एका प्रवाशाने सहप्रवाशाला आग लावली.
Kerala Train Fire
Kerala Train FireDainik Gomantak

Kerala Train Fire: केरळमधील कोझिकोडमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोझिकोडमध्ये रविवारी (2 एप्रिल) एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन प्रवासांमध्ये चढण्यावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीने एका प्रवाशाला पेटवून दिले.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत अनेक लोक जळून खाक झाले असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की आगीमुळे अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली होती. त्यानंतर ट्रेनचा वेग कमी झाल्याने आरोपीने पळ काढला. त्यांनी सांगितले की अद्याप आरोपीची ओळख पटू शकली नाही.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी ( 2 एप्रिल) रात्री ९ वाजुन ४५ मिनिटांनी ही घटना घडली. ही ट्रेन कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर आली होती. दरम्यान, ट्रेनमध्ये बसण्यासाठी दोन प्रवाशांमध्ये चढण्यावरुन भांडण झाले आणि त्या व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. या अपघातात किमान 9 जण जखमी झाल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.

  • दहशतवादी कट असल्याचा पोलिसांचा सशंय

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा ट्रेन कन्नूरला पोहोचली तेव्हा काही प्रवाशांनी घटनेनंतर एक महिला आणि एक मूल हरवल्याची तक्रार केली. ते म्हणाले की, बेपत्ता व्यक्तींची माहिती समोर आल्यानंतर ट्रॅकची पाहणी केली असता त्यांना तीन मृतदेह आढळले. यामध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

त्यांनी सांगितले की, रहमत, त्याची बहीण आणि तिची दोन वर्षांची मुलगी, मत्तनूर येथील रहिवासी अशी मृतांची नावे आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाहून ते ट्रेनमधून पडले किंवा खाली उतरण्याचा प्रयत्न केला असा संशय आहे.

याशिवाय, पोलिसांना या प्रकरणात दहशतवादी कट असल्याचा संशय आहे. कारण ट्रॅकमधून आणखी एक पेट्रोलची बाटली आणि दोन मोबाइल फोन्स असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com