Rahul Gandhi Visit America Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर; म्हणाले, ''त्यांचा अहंकार आणि मूर्खपणा...''

Rahul Gandhi Visit America: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी गाजत आहेत.

Manish Jadhav

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी गाजत आहेत. अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठात नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी देशातील आरक्षणावर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याने देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भारतातील आरक्षणाच्या भवितव्याबद्दल विचारले असता राहुल म्हणाले की, "आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार तेव्हा करु जेव्हा भारताचे एक उचित स्थान असेल पण भारत एक उचित स्थान नाही.''

दरम्यान, राहुल यांच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी अप्रत्यक्षपणे राहुल यांच्यावर निशाणा साधला. धनखर म्हणाले की, 'संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीची अशी टिप्पणी घटनाविरोधी मानसिकता दर्शवते.' मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना धनखर म्हणाले की, ''भारतीय संविधानाबद्दल जागरुकतेची नितांत गरज आहे, कारण काही लोक त्याचा मूळ आत्मा विसरले आहेत.''

उपराष्ट्रपती धनखर पुढे म्हणाले की, ''आरक्षण हे गुणवत्तेच्या विरोधात नाही, तर ते देशाचा आणि संविधानाचा आत्मा आहे. हे सकारात्मक आहे, नकारात्मक नाही. ते कोणाचीही संधी हिरावून घेत नाही, ते समाजाला बळ देणाऱ्या स्तंभांना आधार देते.''

राहुल यांच्या वक्तव्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आपण आरक्षणाच्या विरोधात असल्याचे दाखवण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे राहुल यावेळी म्हणाले. आम्ही आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे घेवून जाणार आहोत, असे मी वारंवार सांगत असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे मात्र, राहुल गांधींचे स्पष्टीकरण येईपर्यंत खूप उशीर झाला होता.

दुसरीकडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींचे 'आरक्षण संबंधित' वक्तव्य निषेधार्ह असून त्यांचा पक्ष महाराष्ट्रासह अन्यत्र काँग्रेस नेत्याच्या विरोधात तीव्र निदर्शने करेल. परदेशात देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना दलित समाजातील लोक धडा शिकवतील, असेही आठवले म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी (त्यांच्या वक्तव्याबद्दल) माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आठवले पुढे म्हणाले की, ''दलित, इतर मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याला ते चांगलाचं धडा शिकवतील.''

राहुल यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षानेही समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) म्हटले की, 'लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने 'आपल्या मूर्ख विधानांनी' अमेरिकेत 'देशद्रोह' केला आहे.' भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा राहुल यांचा 'अहंकार' संसदेत दिसून येतो आणि त्यांचा 'मूर्खपणा' अमेरिकेत दिसून येतो.'

राहुल त्यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहेत. राहुल गांधींनी अमेरिकन खासदार इल्हान उमर आणि इतरांची भेट घेतली ज्यावरुन भाजप हल्लाबोल करत आहे. भाजपने म्हटले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते भारतविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या परदेशातील लोकांना भेटून चुकीची वक्तव्ये करत आहेत.

राहुल गांधी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांचा पहिला मुक्काम शनिवारी डॅलसमध्ये होता. आदल्या दिवशी, गांधींनी यूएस कॅपिटलमध्ये खासदारांच्या गटाची बैठक घेतली. भारताबाबतच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओमर यांच्यासोबत राहुल यांच्या भेटीवर झालेली टीका काँग्रेसने फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, भाजप केंद्रात सत्तेत आहे, त्यामुळे अमेरिकेच्या राजदूताला बोलावून असे काही वाटत असेल तर समज द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT