Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Union Budget 2022: 'मोदी सरकारनं केला मध्यमवर्गीयांचा विश्वासघात'

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षांनी सरकासला चांगलेच धारेवर घेतले. सरकारने देशातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना काहीच दिलासा दिला नाही. ते म्हणाले की पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयाची फसवणूक केली असून तरुणांच्या उदरनिर्वाहावर गुन्हेगारी हल्ला केला आहे, असे म्हणत विरोधकांनी मंगळवारी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प (Budget)2022-23 बाबत सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात काहीच नाही, असे म्हटले आहे. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीच नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट म्हटले आहे की, देशातील जनता कर संकलनाच्या ओझ्याने त्रस्त आहे, तर मोदी सरकारसाठी हा कर मिळवणे ही मोठी उपलब्धी आहे. दृष्टिकोनात फरक आहे - त्यांना फक्त त्यांची संपत्ती दिसते, लोकांचे दुःख नाही.

काय आहे मोदी सरकार च्या बजेट मध्ये: राहुल गांधी

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, " कोरोणा महामारीच्या काळात भारतातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गांना त्यांच्या पगारात सर्वांगीण कपात आणि महागाईच्या काळात दिलासा मिळण्याची अपेक्षा करत होते." पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनी या वर्गांची पुन्हा एकदा थेट निराशा केली आहे. हा पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने 'क्रिप्टो करन्सी'मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लादून बिल न आणता 'क्रिप्टो करन्सी' ही कायदेशीर केली आहे का, असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे

बजेट कोणासाठी आहे? सीताराम येचुरी

सीपीआय(एम) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ट्विट केले, आणि त्यात म्हटले आहे की, आज सादर झालेले बजेट हे कोणासाठी आहे? देशाच्या एकूण संपत्ती पैकी सर्वात श्रीमंत 10 टक्के भारतीयांकडे 75 टक्के संपत्ती आहे. तर सामान्य 60 टक्के लोकांकडे केवळ पाच टक्के मालमत्ता आहे. त्यांनी सरकारला प्रश्न केला आहे की, कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक नफा कमावणाऱ्याना जास्त कर का लावला गेला नाही? शहरी रोजगाराच्या हमीबाबत कोणतीही चर्चा किंवा घोषणा केली नाही. असा दावा ही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT