बजेट दरम्यान राहुल गांधींनी धरलं डोकं अन् झाले ट्रोल

लोकसभेतून राहुल गांधींचा असा एक फोटो समोर आला ज्यामध्ये ते डोके धरून बसलेले दिसत आहेत
c was seen holding his head while presenting Finance Minister union budget
c was seen holding his head while presenting Finance Minister union budgetTwitter
Published on
Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. 2022 च्या अर्थसंकल्पात जनतेसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सभागृहात उपस्थित असलेले सर्व खासदार अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. पण दरम्यान, लोकसभेतून राहुल गांधींचा (Rahul Gandhi) असा एक फोटो समोर आला ज्यामध्ये ते डोके धरून बसलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर यूजर्स राहुल गांधींच्या या फोटोवर मीम्स शेअर करत आहेत. (Rahul Gandhi was seen holding his head while presenting Finance Minister union budget)

त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राहुल गांधी ट्रोल झाले

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. राहुल गांधींचा फोटो शेअर करत साहिल खुराना नावाच्या युजरने ट्विट केले की, 'बजेट गरीब, शेतकरी, दलितविरोधी आहे जे मला समजत नाही आहे.'

c was seen holding his head while presenting Finance Minister union budget
सोशल मिडियावर पडतोय 'अर्थसंकल्पाच्या मीम्स'चा पाऊस

बजेटदरम्यान राहुल गांधी काय विचार करत आहेत?

आणखी एका युजर श्रद्धाने राहुल गांधींचे मीम शेअर करताना ट्विट केले की, 'राहुल गांधी विचार करत आहेत की, 2022चा अर्थसंकल्प का सादर केला जात आहे?' याशिवाय गोपू नावाच्या युजरने ट्विट केले की, जेव्हा रिपोर्टरने राहुल गांधींना बजेटबद्दल (Union Budget) विचारले तेव्हा मी त्यातला तज्ञ नाही, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

c was seen holding his head while presenting Finance Minister union budget
India Budget 2022: संरक्षण क्षेत्रात होणार खासगी कंपन्यांची इंट्री

काँग्रेसने अर्थसंकल्पाला 'विश्वासघातकी' म्हटले

सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने देशातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, 'भारतातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्ग या महामारीच्या युगात, वेतनात झालेल्या पगारामुळे कपात आणि महागाईच्या काळात दिलासा मिळण्याची आशा करत होते. मात्र अर्थमंत्री आणि पंतप्रधानांनी थेट कराशी संबंधित निर्णय देत या वर्गांची पुन्हा एकदा निराशा केली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com