Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: खासदारकी रद्द करून माझे तोंड बंद करू शकणार नाहीत; मोदी अदानींना का वाचवत आहेत?

राहुल गांधींची पत्रकारपरिषद; प्रश्न विचारतच राहणार, अदानींना

Akshay Nirmale

Rahul Gandhi on Dissqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. राहुल गांधी म्हणाले की, मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. त्यांना दाखवून दिले की, अदानींसाठी विमानतळांचे नियम वाकवले गेले. पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. खासदारकी रद्द करून ते माझे तोंड बंद करू शकत नाहीत. मी प्रश्न विचारतच राहणार, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

संसदेत एखाद्यावर आरोप केले तर त्यावर स्पष्टीकरण देण्याचा अधिकार संबंधित सदस्याला असतो. मी दोन वेळा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. पण माझी दखल घेतली नाही. मी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेटलो पण ते केवळ हसले. काही करू शकत नाही म्हणाले, असेही राहुल यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, मला माझी खासदारकी पुन्हा मिळेल की नाही याचा मला काहीही फरक पडत नाही. मी माझे काम करत राहणार. संसदेत असो की संसदेच्या बाहेर, मी माझे काम करतच राहणार.

अदानी यांनी २० हजार कोटी रूपये शेल कंपन्यांमध्ये ठेवले आहेत. त्यावर कुणीच काही बोलत नाही. मोदी आणि अदानी यांचे संबंध समोर आले आहेत. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये हे पैसे कुठून आले. हे पैसे कुणाचे आहेत त्यांना तुरूंगात टाकले गेले पाहिजे.

माझ्या पुढच्या भाषणांच्या भीती मोदींना वाटते आहे. अदानी भ्रष्ट आहेत हे लोकांना माहिती आहे. पण नरेंद्र मोदी त्यांना का वाचवत आहेत हे कळले पाहिजे. अदानींवर टीका म्हणजे देशावर टीका असे भाजप म्हणते. म्हणजे यांच्या डोक्यात अदानी म्हणजे देश आहे.

राहुल गांधी म्हणाले, देशातील लोकशाहीला वाचवण्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. लोकशाही वाचवणे म्हणजे खरे बोलणे. खासदारकी रद्द होणे हा कायदेशीर मामला आहे. त्याविषयी बोलणार नाही. पण त्याने मला फरक पडत नाही. जेव्हा एखाद्याला गिल्टी वाटत असते तेव्हा ते विषयांतर करतात. दुसरीकडे बोट दाखवतात. भाजप हेच करत आहेत.

माफी मागायला मी सावरकर नाही. मी गांधी आहे. देशात लोकशाहीवर आक्रमण झाले आहे. त्याचा पाया मोदी आणि अदानींचे संबंध आहेत. अदानींना मोदी का वाचवत आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT