Rahul Gandhi Carpenter Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'कुली' नंतर, राहुल आता बनले 'कारपेंटर', आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटला दिली भेट

Rahul Gandhi Carpenter: काही दिवसांपूर्वी कुली म्हणून लोकांचे सामान घेऊन जाताना दिसणारे राहुल गांधी गुरुवारी आशियातील सर्वात मोठे फर्निचर मार्केट कीर्ती नगरमध्ये पोहोचले.

Manish Jadhav

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कुली म्हणून लोकांचे सामान घेऊन जाताना दिसणारे राहुल गांधी गुरुवारी आशियातील सर्वात मोठे फर्निचर मार्केट कीर्ती नगरमध्ये पोहोचले.

याठिकाणी त्यांनी कारागिरांची भेट घेऊन त्यांच्याबद्दल जाणून घेतले. राहुल गांधींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राहुल यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'आज मी दिल्लीतील कीर्तीनगर येथील आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटला भेट दिली. इथे मी कारागिर बांधवांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्या कौशल्याबद्दल जाणून घेतले आणि थोडं शिकण्याचा देखील प्रयत्न केला.'

एएनआय या वृत्तसंस्थेने फर्निचरच्या दुकानात राहुल गांधी (Rahul Gandhi) पोहोचल्याची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांमध्ये राहुल गांधी एका फर्निचरच्या दुकानात काम करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांनी कार्यकर्त्यांशी केवळ संवाद साधला नाही तर त्यांची काम करण्याची पद्धतही समजून घेतली. नुकतेच राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर होते.

बिलासपूरमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर त्यांनी बिलासपूरहून रायपूरला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास केला होता.

यावेळी राहुल गांधींनी ट्रेनच्या स्लीपर कोचमधून प्रवास केला आणि तिथे उपस्थित प्रवाशांशी चर्चा केली. राहुल यांनी त्यांच्या समस्या तर ऐकल्याच शिवाय महिला खेळाडूंशी चर्चासुद्धा केली. एका फोटोमध्ये ते एका मुलीच्या वहीवर काहीतरी काढतानाही दिसले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी दिल्लीतील (Delhi) आनंद विहार रेल्वे स्टेशनवर गेले होते, तिथे त्यांनी कुलींचे कपडे परिधान करुन त्यांची भेट घेतली होती. कुलींची अडचण कळल्यानंतर राहुल यांनी सर्वसामान्य पोर्टरप्रमाणे लोकांचे सामान डोक्यावरुन नेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: घोगळ येथे महिलेचे सुवर्णालंकार लांबविले

पर्रीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर विकास अडवू नका, त्याला गती द्या! डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाद

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

SCROLL FOR NEXT