Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
देश

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधीची पाठिंबा

भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी वाड्रासह पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रेहान वाड्राही या यात्रेत सामील झाला आहे.

दैनिक गोमन्तक

राहूल गांधीची 'भारत जोडो यात्रा' दक्षिण आणि पश्चिमेकडील सहा राज्यांमधून गेली आणि भाजपशासित मध्य प्रदेशात दाखल झाली. 3,570 किमी पायी पदयात्रा आज राज्यात बोरगॉन गावातून सुरू झाली आहे. यामध्ये प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा सह पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रेहान वाड्राही या यात्रेत सामील झाला आहे.

आजचे प्रवासाचे वेळापत्रक

बोरगाव येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. रात्री दहाच्या सुमारास दुल्हार फाट्याजवळ काही काळ प्रवास थांबवण्यात येणार आहे. यानंतर यात्रा सुरू होऊन बडोदा अहिर येथे पोहोचेल. येथे दुपारी राहुल गांधी तंट्या भील यांना श्रद्धांजली अर्पण करतील. दुपारी 2.35 वाजता आदिवासी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ही यात्रा पंठाणा - गुरुद्वारा साहिब येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल. व सायंकाळी 7-8 च्या सुमारास रोशिया (खेर्डा) येथे यात्रा विसावणार आहे.

5 डिसेंबर रोजी ही यात्रा मध्य प्रदेशातील 399 किलोमीटरचे अंतर कापून बुरहानपूर, खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर-मालवा या सहा जिल्ह्यांतील 25-30 विधानसभा मतदारसंघांतून राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. मध्य प्रदेशातील लोकसभेच्या पाच जागा भारत जोडो यात्रेच्या मार्गात येतात. खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि देवास. या सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

  • काँग्रेसचे 16 जागांवर लक्ष आहे

काँग्रेसचे लक्ष सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या या मार्गातील 16 विधानसभा जागांवर आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 16 जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. राज्यातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला, परंतु कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे सरकार दोन वर्षांनंतर पडले कारण ज्योतिरादित्य सिंधिया 20 हून अधिक आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले.

राहुल गांधी मोदी सरकारवर नाराज

ट्रान्सपोर्ट नगर, बुरहानपूर येथे जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर टीका केली , महागाई, अग्निवीर योजनेतील कथित त्रुटी आणि सरकारी संस्थांचे खाजगीकरण याकडे लक्ष वेधले. ते संबोधित करताना म्हणाले, "नोटाबंदी आणि जीएसटी हे धोरण नाही, ते एक शस्त्र आहे. ही शस्त्रे लहान व्यापारी, शेतकरी, मजूर आणि एमएसएमईंना मारण्यासाठी वापरली जात होती. यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT