rahul gandhi Dainik Gomantak
देश

राहुल गांधींची ईडीने केली पाचव्या दिवशी 10 तास चौकशी

ईडीने राहुल गांधींची पाचव्या दिवशी 10 तास चौकशी केली आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. त्यांच्या चौकशीचा हा पाचवा दिवस होता. चौकशी केल्यानंतर राहुल अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयातून निघून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींची (Rahul Gandhi) जवळपास 10 तास चौकशी केली. आज राहुल यांना जेवणाची सुट्टीही मिळाली नाही. सीआरपीएफ जवानांच्या ‘झेड प्लस’ श्रेणीच्या सुरक्षेसह राहुल गांधी मंगळवारी सकाळी 11.15 वाजता मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.

दुसरीकडे, सोमवारी राहुल यांची जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली. गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडी अधिकाऱ्यांनी 52 वर्षीय राहुल यांची 30 तासांहून अधिक चौकशी केली होती. ज्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते.

तसेच, याच प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही ईडीने 23 जून रोजी समन्स बजावले आहे. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांना नुकतेच दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून त्यांना सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

शिवाय, कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे की, 'डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.' आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांना 'यंग इंडियन'ची स्थापना, 'नॅशनल हेराल्ड'चे ऑपरेशन आणि काँग्रेसने (Congress) असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला दिलेली कर्जे आणि निधी हस्तांतराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इतर काही काँग्रेस नेते 'यंग इंडियन'चे प्रवर्तक आणि भागधारक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT