Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींची चौकशी पूर्ण, ईडीने विचारले हे प्रश्न

दैनिक गोमन्तक

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींची ईडी चौकशी संपली आहे. ईडीने राहुल यांची जवळपास तीन तास चौकशी केली. यामध्ये ईडीने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे राहुल यांच्याकडे मागितली. (rahul gandhi interrogation ends with ed comes out office)

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने विचारले की, यंग इंडिया आणि एजेएल यांच्यातील कराराचा तुम्हाला कसा फायदा झाला. याशिवाय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना विचारले की, यंग इंडियामध्ये तुमची भूमिका काय होती आणि तुम्ही कंपनीचे शेअरहोल्डर कसे झालात. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल गांधी यांची 38 टक्के भागीदारी आहे.

दुसरीकडे, राहुल गांधींची एका सहाय्यक संचालक स्तरावरील अधिकाऱ्याने चौकशी केली. तर संपूर्ण प्रक्रिया उपसंचालक आणि सहसंचालक यांच्या देखरेखीखाली पार पडली. याशिवाय एक अधिकारी चौकशीदरम्यान राहुल गांधींची उत्तरे टाइप करत होता. राहुल गांधींना पहिल्यांदाच असे सवाल करण्यात आला आहे. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही एजन्सीने 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'त्या दिवशीही आम्ही रस्त्यावर उतरुन सूडाच्या भावनेने होत असलेल्या कारवाईला विरोध करु.'

तसेच, रॉबर्ट वड्रा यांनी राहुल गांधींना समन्स बजावल्याबद्दल सांगितले की, 'सरकारी यंत्रणांकडून गांधी कुटुंबाचा छळ केला जात आहे. मी एजन्सीला साधारण 15 वेळा उत्तरे दिली आहेत. त्याचबरोबर 23 हजार कागदपत्रांची पूर्तताही करुन देण्यात आली होती.' ते पुढे म्हणाले की, ''सप्टेंबर 2021 मध्ये मला 72 नोटिसा मिळाल्या होत्या. विरोधकांना त्रास देण्याचा हा एक मार्ग आहे. विरोधकांना त्रास देणे ही भाजपची कटू निती आहे.''

विशेष म्हणजे, राहुल गांधी आज सकाळी 11.15 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. तत्पूर्वी, ते प्रियंका गांधींसोबत घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयापर्यंत पायी कूच केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी केवळ राहुल गांधी आणि प्रियंका यांना ईडीच्या कार्यालयात जाण्याची परवानगी दिली. भूपेश बघेल, अशोक गेहलोत, रणदीप सुरजेवाला, पी. चिदंबरम यांच्यासह सर्व नेत्यांना बाहेर थांबवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT