Rahul Gandhi News | National Herald Case  Dainik Gomantak
देश

National Herald Case: सलग तिसऱ्या दिवशी होणार राहुल गांधींची ईडी चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात चौकशी पूर्ण झाली.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi News: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात चौकशी पूर्ण झाली. 17 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली आहे. बुधवारीही राहुल गांधींना ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चौकशीदरम्यान राहुल गांधींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा चौकशीसाठी बोलावू नका, असे सांगितले. सोमवारी त्यांची 9 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. मंगळवारीही चौकशी करण्यात आली. (rahul gandhi in ed office second day rahul gandhi will face questions again in ed office tomorrow)

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 10 वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीप्रकरणी गांधी परिवाराच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सोनिया गांधी (Sonia Gandhi) रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे त्यांची अद्याप चौकशी झालेली नाही. तर राहुल गांधींची दिल्लीतील (Delhi) ईडी कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन चौकशी करण्यात आली.

कोणते प्रश्न विचारले गेले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने राहुल गांधींना (rahul gandhi) विचारले की, एजेएलला दिलेली 50 लाखांची रक्कम कुठून आली? या रकमेच्या बदल्यात तुम्हाला नॅशनल हेराल्डची मालमत्ता मिळाली का, असेही एजन्सीने विचारले. एजन्सीने त्यांना यंग इंडिया लिमिटेड कंपनी का स्थापन केली, अशी विचारणाही केली. मात्र, सर्व प्रश्नांवर त्यांनी मौन बाळगले.

काँग्रेसने विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे

दिल्लीतील ईडी कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींची चौकशी केली, तर दुसरीकडे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर निदर्शने सुरुच ठेवली. यावेळी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेऊन गुप्त ठिकाणी नेले. मोदी सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात संपूर्ण विरोधकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केले.

लंच ब्रेक दरम्यान प्रियंका गांधी आपल्या भावाला भेटण्यासाठी पोहोचल्या

मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना दुपारी 3.30 वाजता जेवणाच्या सुट्टीसाठी एक तासाचा वेळ दिला होता. यादरम्यान प्रियंका गांधी आपल्या भावाला भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी ईडीच्या चौकशीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

एआयसीसी कार्यालयात जाण्यास बंदी

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काँग्रेस नेत्यांना एआयसीसी कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. दुसरीकडे ईडी कार्यालयाबाहेरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग लावण्यात आले होते.

राहुल-सोनिया गांधी का आहेत निशाण्यावर?

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे यंग इंडिया लिमिटेड कंपनीचे 76 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यंग इंडिया लिमिटेड कंपनी ना-नफा-ना तोटा तत्वावर स्थापन करण्यात आली होती. ईडीने 23 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT