National Herald Case | नॅशनल हेराल्ड समन्सप्रकरणी गोव्यात कॉंग्रेस आक्रमक

‘ईडी’समोर निदर्शने : विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप
National Herald Case
National Herald CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभरातील ईडी कार्यालयांसमोर मोर्चा काढून निदर्शने केली. याचाच भाग म्हणून गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आज सकाळी पाटो, पणजी येथील ईडीच्या गोवा विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.(National Herald Case)

National Herald Case
कोपार्डेतील बिंदिया ठरली पहिली होमिओपॅथिक डॉक्टर

मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फरेरा, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष ॲड.वरद म्हार्दोळकर व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विरोधीपक्ष नेते मायकल लोबो म्हणाले,की देशभर सुडाचे राजकारण सुरू असून सत्ताधारी विरोधकांना लक्ष्य करत आहेत. यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापरही सुरू आहे. हे लोकशाही साठी घातक आहे.काही लोकांचे तोंड बंद करण्यासाठी विविध सरकारी संस्थांच्या वतीने खोटे खटले दाखल केले जात असून यासाठी सरकारी यंत्रणेला हाताशी धरले जात आहे. हा विरोधकांना संपवण्याचा डाव असून लोकशाहीवरील हल्ला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी सुरू केलेल्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राला मदत करण्यासाठी काँग्रेस सरकारकडून 90 कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. पत्रकारांचे वेतन, निवृत्तीवेतन, वीज बील आणि इतर थकबाकी देण्यासाठी ही आर्थिक मदत करण्यात आली होती, त्यावरून केंद्र सरकार आमचे नेते सोनिया आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहे.

-अमित पाटकर, गोवा प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com