Prashant Kishor, Rahul Gandhi, Narendra Modi Dainik Gomantak
देश

नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये आहे का? प्रशांत किशोरांनी दिलं उत्तर

गुजरात आणि हिमाचलमध्ये काँग्रेसचा पराभव होईपर्यंत पक्ष नेतृत्वाला वेळ देण्याचे काम चिंतन शिबिरात करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसने राजस्थानमधील उदयपूर येथे तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. ज्यामध्ये पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली, तसेच आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आली. आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या चिंतन शिबिराची खिल्ली उडवली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चिंतनशिबिर काहीही सार्थक करण्यात अपयशी ठरलं आहे. इतकेच नाही तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचेही पीके म्हणाले. (Prashant Kishor)

चिंतन शिबिराबद्दल काय म्हणाले पीके?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उदयपूरमध्ये नुकतेच संपलेले काँग्रेसचे चिंतन शिविर अपयशी ठरले आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, "मला वारंवार उदयपूर चिंतन शिबिराच्या निकालावर भाष्य करण्यास सांगितले जात आहे. माझ्या मते, स्थिती सुधारणे आणि काँग्रेस नेतृत्वाला थोडा वेळ देणे याशिवाय अर्थपूर्ण काहीही साध्य करण्यात यश आले नाही."

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर 2 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये राजकीय भवितव्य घडवण्यासाठी पदयात्रा सुरू करणार आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून प्रशांत किशोर जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. नुकतेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या अटकेला पूर्णविराम देत आपण कोणत्याही पक्षासोबत जात नसल्याचे सांगितले.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान प्रशांत किशोर यांना पत्रकाराने विचारले, ' नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची ताकद राहुल गांधींमध्ये आहे का?' यासोबतच प्रशांत किशोर यांना विचारण्यात आले की, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यामध्ये कोण काँग्रेसला चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकते की गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला पुढे नेणे अधिक योग्य ठरेल? अशा अनेक प्रश्नांना उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, राहुल गांधी मोदींना आव्हान देऊ शकतात की नाही, हे देशातील जनताच सांगू शकते. आमच्यासारखे लोक यावर फक्त मत म्हणून बोलतील. आजच्या परिस्थितीनुसार काँग्रेसने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पुढे जावे, असे आपला मुद्दा पुढे करत प्रशांत किशोर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT