Cambridge University seminar Dainik Gomantak
देश

''भारतात ध्रुवीकरणाच्या रॉकेलने जातीयवाद पेटवण्याची केंद्राची तयारी''

केंब्रिज विद्यापीठ चर्चासत्रात राहुल गांधींनी केंद्रसरकारच्या सक्षमतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते राहुल गांधी सद्या लंडनला दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात आयडियाज ऑफ इंडिया परिषदेला संबोधित केले. यावेळी देशात वाढत असलेला जातियवाद, केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण, रुपया घसरत असताना अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली ध्येय धोरणे, भारतातील लोकशाहीची स्थिती यावरुन केंद्र सरकारवर हल्ला बोल केला. (Rahul Gandhi criticizes central government in Cambridge University seminar )

देशातील वाढता जातीय तणाव याबाबत राहूल गांधी यांना प्रश्न विचारला असता, देशाच्या ध्रुवीकरणासाठी भाजप रॉकेल शिंपडत आहे. तुम्हाला फक्त एक ठिणगी टाकायची आहे, मग देश स्वतःच जळायला लागेल, असे ते यावेळी म्हणाले. देशावर आर्थिक संकट घोंगावत असताना सरकार याबाबत गंभीर नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच 1991 च्या धोरणांनी तुम्ही आता संकट संपवू शकत नाही.

मनमोहन सिंग यांना मी २०१२ मध्ये विचारले होते, त्यांचे उत्तर होते की आता आम्ही नव्या युगात प्रवेश केला आहे, जुनी धोरणे चालणार नाहीत. सरकार संकटाचा सामना करण्यासाठी पुढाकार घेत नाही आणि कोणाचेही ऐकत नाही. त्यामूळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर नव - नवी संकटे उभी आहेत. यासाठी नवे मार्ग शोधावेच लागतील. अन्यथा भारतावर ही अर्थिक संकट अटळ असल्याचे ते म्हणाले.

एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल म्हणाले. भाजपच्या लोकांनी घटनात्मक पदांवर कब्जा केला आहे. सर्व शासकीय संस्थांमध्ये मागून लोकांना प्रवेश दिला जात आहे. आम्ही या लोकांशी लढत आहोत. तसेच संस्थांचा सुरु असलेला सोयिस्कर वापर यावर ही नियंत्रण आवश्यक असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. तसेच भारतातील लोकशाहीची स्थिती सद्या चांगली नाही. असे ही ते म्हणाले.

आम्हाला जनतेत जाता येत नाही. भाजपला मत न देणाऱ्या 65 टक्के लोकांपर्यंत आम्हांला अधिक आक्रमकपणे जाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. माश्र हे सर्व मिळून करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा आणि मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेत्यांनी ही हजेरी लावली होती. तसेच या दौऱ्यात भारतीय समुदायाला भेटण्याचा कार्यक्रमही नियोजित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT