Purvanchal Expressway Road Accident Dainik Gomantak
देश

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

Purvanchal Expressway Road Accident: अयोध्या येथील पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर आज (7 ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यामध्ये तीन खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Purvanchal Expressway Road Accident: अयोध्या येथील पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर आज (7 ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यामध्ये तीन खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. लखनौहून देवरियाच्या दिशेने जाणारी अर्टिगा कार सुमारे 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावत होती. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारचा चुराडा झाला. कारमध्ये प्रवास करणारे सर्व सहा जण थकल्यामुळे गाढ झोपेत होते, अशी माहिती जखमी खेळाडू जयंतो शर्मा याने पोलिसांना दिली. हे सर्वजण लखनौ येथे टेनिसचा सामना खेळून आपल्या गावी परतत होते.

या भीषण अपघातात (Accident) 22 वर्षीय नित्या प्रजापति, 24 वर्षीय अनिकेत आणि 20 वर्षीय इरफान अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाचे सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि अयोध्या जिल्ह्यातील कुमारगंज येथील सौ शैय्या संयुक्त रुग्णालयात हलवले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या 23 वर्षीय आनंद यादव, 30 वर्षीय जयंतो शर्मा आणि 22 वर्षीय राजू यांना पुढील उपचारासाठी दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात ट्रकचा शोध सुरु केला असून, अपघात नेमका कसा घडला याच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या दुर्घटनेमुळे खेळाडूंच्या कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील वेगाच्या नियमांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT