पंजाबमधील लुधियानामधील जिल्हा न्यायालयाच्या (Ludhiana Court) आवारात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला, ज्यात एका महिलेसह दोन जण ठार झाले. त्याचवेळी या स्फोटात किमान 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अहवालानुसार, हा संशयित स्फोट न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी न्यायालय संकुलात पोहोचून तपास सुरु केला. जखमींना रुग्णालयात (Hospital) तात्काळ हालविण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानाच्या जिल्हा न्यायालयाच्या तिस-या मजल्यावर 9 क्रमांकाच्या कोर्टाजवळ असलेल्या एका वॉशरुममध्ये बॉम्बचा स्फोट झाला, ज्यामध्ये दोघांच्या मृत्यूची पुष्टी झाली. स्फोट इतका जोरदार होता की, संपूर्ण इमारत हादरली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. स्फोटामुळे तळमजल्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरु असताना न्यायालयाच्या आवारात हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी लुधियानाला भेट देणार
स्फोटानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (charanjit singh channi) यांनी सांगितले की, आम्ही लुधियानाला जात असून घटनास्थळाची प्राथमिकत माहिती घेणार आहेत. ते पुढे म्हणाले, “पंजाबचे (Punjab) वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका येताच काही देशद्रोही तत्व अशा घटना घडवून आणतात. सरकार सतर्क आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना सोडले जाणार नाही."
अलीकडेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने अमृतसरमधील (amritsar) सुवर्ण मंदिर आणि कपूरथला येथील गुरुद्वारात कथित अपवित्र प्रकरणी दोन लोकांच्या हत्येनंतर पंजाब सरकारला अलर्ट जारी केला होता. केंद्र सरकारने पंजाबमधील सर्व धार्मिक स्थळे, डेरे, मंदिरे, गुरुद्वारा आणि इतर सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याची नापाक योजना ‘देशद्रोही’ घटकांकडून सुरु असल्याचा इशारा गृह मंत्रालयाने दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.