Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

Agnipath Scheme: अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेने ठराव केला मंजूर

अग्निपथ योजनेचा मुद्दा लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडणार- मुख्यमंत्री भगवंत मान

दैनिक गोमन्तक

पंजाब विधानसभेने गुरुवारी केंद्राच्या अग्निपथ संरक्षण भरती योजनेच्या विरोधात ठराव मंजूर केला. मात्र, भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार अश्विनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना मान म्हणाले की, अग्निपथ योजनेचा मुद्दा लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडणार आहे. ही योजना देशातील तरुणांच्या विरोधात आहे, असे अग्निपथ योजनेला विरोध करताना मान म्हणाले. (Agnipath Scheme Impact in Punjab)

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली होती. अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत ही योजना मागे घेण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या करारावर 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू झाली. नंतर या वर्षासाठी भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली.

भाजप सरकारची अग्निपथ योजना अत्यंत अतार्किक आहे. ज्यामुळे भारतीय लष्कराची जडणघडण खराब होईल, असे मत या योजनेला विरोध करताना भगवंत मान यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, राजस्थान सरकारनेही केंद्राला ही योजना मागे घेण्याचे आवाहन केले आहे. राजस्थान सरकारने एक ठराव मंजूर करुन ही विनंती केली आहे. या प्रस्तावावर ठराव करण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत अग्निपथ योजनेला देशातील तरुणांकडून होत असलेल्या विरोधावरही चिंता व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT