punjab fire Danik Gomantak
देश

पंजाबच्या गुरुनानक रुग्णालयात भीषण आग, रुग्णांना बाहेर काढण्यात अपय़श

आगीचा धूर संपूर्ण रुग्णालयात पसरला

दैनिक गोमन्तक

पंजाबच्या अमृतसरमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील गुरुनानक रुग्णालयात आग लागली आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हॉस्पिटलच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरमधून निघालेली ठिणगी हे आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. (punjab fire breaks out in amritsar guru nanak hospital patients are unable to get out)

मिळालेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने लागली की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. रुग्णांनी आरडी-ओरडा सुरू केला. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

हॉस्पिटलच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मर आग लागली, त्यानंतर आगीचा धूर संपूर्ण रुग्णालयात पसरला, त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी नातेवाईकांसह बाहेर रस्त्याकडे धाव घेतली. रुग्णालयाच्या विविध वॉर्डांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण बाहेर धावून रस्त्यावर पडून होते. रुग्णांच्या म्हणण्यानुसार, आगीच्या धुरामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते, परंतु कोणीही त्यांना मदत केली नाही आणि त्यांनी स्वतःहून बाहेर येऊन त्यांचे प्राण वाचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT