Punjab Drone Attack

 
Dainik Gomantak
देश

पंजाबमध्ये बीएसएफने पकडले 'मेड इन चायना' पाकिस्तानचे ड्रोन

हे ड्रोन चीनमध्ये बनले असून ते पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत घुसले आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये शुक्रवारी रात्री बीएसएफने पाकचे एक ड्रोन ताब्यात घेतले आहे, मात्र सीमा सुरक्षा दलाने पकडलेल्या ड्रोनमधून काहीही मिळालेले नाही. आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. बटालियन 103 ने अमरकोट परिसरातून ड्रोन पकडले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या बीओपी आणि तारा सिंगजवळची ही घटना आहे. हे ड्रोन चीनमध्ये बनले असून ते पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत घुसले आहे.

दुसरीकडे, पंजाबमध्ये (Punjab) ड्रोन पकडल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर खिल्ली उडवली. ते म्हणाले की, दिवसभर भांगडा करण्याऐवजी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गृहमंत्र्यांना सक्रिय राहण्याचा व बाहेर येण्याचा सल्ला दिला पाहिजे. त्यांनी चन्नी यांना सांगितले की, जर तुमच्या पक्षाचे अध्यक्ष तुमचे ऐकत नसतील तर त्यांना इम्रान खान यांना पंजाब राज्याला त्रास देण्याचा प्रयत्न थांबवण्यास सांगा.

शुक्रवारी 130 कोटींचे हेरॉईन (Heroin) पकडण्यात आले

तत्पूर्वी, सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी सीमेवरून 130 कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले. दाट धुक्याचा फायदा घेत पाक तस्कर हेरॉईनची पाकिटे टाकण्यासाठी भारतीय हद्दीत पोहोचले होते. त्यांच्या कारवाया लक्षात आल्यानंतर सकाळी या ठिकाणी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. बीएसएफला हेरॉइनची सुमारे 25 पॅकेट सापडली आहेत, ज्यांचे वजन अंदाजे 26 किलो, 700 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत 130 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही घटना बीएसएफच्या मोजम फॉरवर्ड, बीओपी (आउटपोस्ट) जवळ घडली.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ बटालियन-66 चे जवान गुरुवारी रात्री दाट धुक्यात सीमेवर गस्त घालत होते. त्यांना दाट अंधारात कुंपण ओलांडून पाक तस्करांच्या हालचाली जाणवल्या. शुक्रवारी सकाळी बीएसएफच्या (BSF) जवानांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या भागात शोधमोहीम सुरू केली. विशेष म्हणजे गुरुवारी थंडीच्या मोसमातील पहिले धुके पडले. दोन्ही देशांचे तस्कर धुक्याची वाट पाहत होते. या धुक्याच्या आडून पाकिस्तानी तस्कर हेरॉईन पोहोचवण्यासाठी आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT