Punjab CM Charanjit Singh Channi may tender resignation today  Dainik Gomantak
देश

'या' राज्याचे मुख्यमंत्री देणार आज राजीनामा

पंजाबमध्ये कॅप्टन पराभूत, चन्नी हारण्याच्या वाटेवर, 'आप'चा बोलबाला...

दैनिक गोमन्तक

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) लवकरच पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन राजीनामा देणार आहेत. चन्नी गुरुवारी सकाळी चंदीगड येथील राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सकाळी 10:50 च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार चन्नी चमकौर साहिब आणि भदौर येथून पिछाडीवर असल्याचे निवडणुकीच्या (Election) निकालांमध्ये दिसून आले आहे. चन्नी हे मतांच्या संख्येत आणि मतांच्या संख्येत आपच्या चरणजित सिंह यांच्या मागे आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय वादळ उठले होते. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नाराजीमुळे राजीनाना त्यानंतर चरणजित सिंग चन्नी हे पंजाबचे (Punjab) नवीन मुख्यमंत्री झाले, त्यानंतर अमरिंदर सिंग भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत नवीन पक्ष स्थापन केला. तर आम आदमी पार्टीने पंजाबमधील निवडणूक चुरशीची केली. त्यामुळे आता AAP ला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळू शकते. तर इतर राज्य जसे की, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या तीनमध्ये काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये लढत चुरशीची असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक जागा कोण आणि सरकार कोणाची असेल हे पाहणे महत्वाचे असेल.

ECI नुसार चन्नी यांना 19,507 मते आणि 43.29 टक्के मते मिळाली आहेत तर सिंग यांना 20,945 मते आणि 46.48 टक्के मते मिळाली आहेत. भदौरमध्ये चन्नी हे आपचे लाभसिंग उगोके यांच्या मागे आहेत. चन्नी यांना 5,460 मते मिळाली आहेत, तर उगोके यांना 8,921 मते मिळाली आहेत.

सीएम चन्नी आपल्या घरच्या मतदारसंघातून चमकौर साहिबमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांना बर्नाला जिल्ह्यातील भदौर, दुसऱ्या जागेवरूनही उमेदवारी देण्यात आली होती.

117 विधानसभा (Assembly) जागांसाठी गुरुवारी कडक सुरक्षा व्यवस्था असताना मतमोजणी सुरू झाली. प्रमुख उमेदवारांमध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी, आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग आणि एसएडी प्रमुख सुखबीर सिंग बादल यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT