Gurnam Singh Charuni

 
देश

Punjab Assembly Election: 'या' शेतकरी नेत्याने राजकीय पक्षाची केली स्थापना

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले नेते गुरनाम सिंग चढूनी (Gurnam Singh Charuni) यांनी शनिवारी आपला राजकीय पक्ष सुरु केला.

दैनिक गोमन्तक

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले नेते गुरनाम सिंग चढूनी (Gurnam Singh Charuni) यांनी शनिवारी आपला राजकीय पक्ष सुरु केला. चढूनी यांनी जाहीर केले की त्यांचा पक्ष पंजाब विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करेल. गुरनाम सिंग चधुनी हे 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचे सक्रिय सदस्य होते. त्यांची हरियाणा (Haryana) भारतीय किसान युनियन ही शेतकरी संघटना त्या 40 पक्षांमध्ये होती. मोर्चाने कृषी कायद्यांच्या विरोधात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

दरम्यान, आमच्या पक्षाचे नाव संयुक्त संघर्ष पार्टी असेल, असे चढूनी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राजकारणात येण्याचा आमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांना पुढे आणणे आहे जेणेकरुन ते जनतेची सेवा करु शकतील. मात्र, आपण स्वत: पंजाब विधानसभेची निवडणूक (Punjab Assembly Election) लढवणार नसल्याचे चढूनी यांनी स्पष्ट केले. अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, परंतु आमचा पक्ष सर्व 117 जागा लढविण्याचा प्रयत्न करेल, असे शेतकरी नेत्याने स्पष्ट केले.

शिवाय, मोठे राजकीय पक्ष भांडवलदारांच्या फायद्यासाठी धोरणे आखतात आणि गरिबांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप त्यांनी केला. अशा राजकारणामुळे भांडवलदार देश ताब्यात घेत आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे देशाला लुटणाऱ्या अशा लोकांना हाकलून देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT