Punjab & Haryana High Court Dainik Gomantak
देश

Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

Domastic Violence: आरोपीने अशा कृत्याद्वारे मृत व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केले होते, असे सिद्ध करण्यास सक्षम पुरावे उपस्थित करण्यास फिर्यादी बांधील आहे.

Ashutosh Masgaunde

सासरी असताना महिलेने आत्महत्या केल्यास तिच्या, पती आणि सासरच्या व्यक्तींना कोणत्याही पुराव्याशिवाय लगेचच आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही. असे निरीक्षण करून, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 2002 च्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून, एकाची निर्दोष मुक्तता कायम ठेवली आहे.

हुंड्याच्या मागणीमुळे झालेल्या छळाला कंटाळून 2002 मध्ये मृत महिलेने तिच्या सासरी आत्महत्या केली होती. महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना ट्रायल कोर्टाने 2006 मध्ये निर्दोष सोडले होते.

आरोपीचे कृत्य, अपशब्दांचा वापर किंवा अपमानास्पद वागणूक आत्महत्येस प्रवृत्त करणारे कृत्य नाही. आरोपीने अशा कृत्याद्वारे मृत व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केले होते, असे सिद्ध करण्यास सक्षम पुरावे उपस्थित करण्यास फिर्यादी बांधील आहे. तिच्या सासऱ्यांविरुद्ध आणि पतीविरुद्ध गुन्हा घडवण्यात त्यांचा सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस किंवा निर्णायक पुरावा नव्हता. आत्महत्येस प्रवृत्त करण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला भडकवण्याची मानसिक प्रक्रिया असते. पत्नीने केवळ सासरी आत्महत्या केल्यामुळे, पती व सासऱ्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही.
न्यायमूर्ती, एन.एस. शेखावत

मृत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या पती आणि सासऱ्याला, ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते.

या विरोधात राज्याने दाखल केलेल्या अपीलावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा हा निकाल कायम ठेवला.

मृत पत्नीचा पती तिच्याकडे हुंड्याची मागणी करायचा आणि मागणी केलेले पैसे न दिल्यास मारहाण करण्याची धमकी द्यायचा. तिच्या मृत्यूच्या सुमारे एक आठवडा आधी, मृताचे कुटुंबीय तिला भेटायला गेले असता, तिने त्यांना सांगितले की, तिच्या पतीचे कुटुंबीय तिचा छळ करत आहेत. असे फिर्यादीत म्हटले आहे.

पतीने बनावट औषधांचा कारखाना काढण्यासाठी पतीने 3 लाख रुपयांची मागणी केली होती. चार दिवसांत पैसे न दिल्यास तिचे जीवन संपवू, अशी धमकीही तिच्या पतीने दिली होती, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

"मृत पत्नीच्या वडिलांनी कबूल केले आहे की, तिच्या लग्नाच्या 18 वर्षांच्या कालावधीत पतीने गैरवर्तन केल्याचा आरोप करणारी कोणतीही तक्रार केलेली नाही. मृत महिलाचा पती पैशांच्या मागणी करण्यासाठी पत्नीच्या वडिलांकडे कधी गेला याचा पुरावा नाही. तसेच मृत पत्नी आणि पतीची दोन मुले सासरी चांगल्याप्रकारे वाढत आहेत." असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने असेही सांगितले की, फिर्यादी साक्षीदारांनी प्रतिवादींवर लावलेले आरोप हे अस्पष्ट आणि सामान्य होते. आणि उलटतपासणीच्या चाचणीला ते टिकू शकले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT