Project Cheetah  Dainik Gomantak
देश

Project Cheetah: कसे असेल प्रोजेक्ट चित्ताचे दुसरे पर्व?

Project Cheetah: गांधी सागर अभयारण्य आणि नौरादेही या दोन अभयारण्यात या चित्त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, कारण कुनो नॅशनल पार्कमध्ये २० चित्यांची क्षमता आहे.

दैनिक गोमन्तक

Project Cheetah: 17 सप्टेंबर २०२२ ला भारतात प्रोजेक्ट चीता ची सुरुवात झाली होती. दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते आणले होते. भारतातून नष्ट झालेल्या चित्त्यांचे पूनर्वसन करण्यासाठी भारताचे हे मोठे पाऊल मानले जात होते.

आता १७ सप्टेंबरला या प्रोजेक्टला १ वर्ष पूर्ण होत आहे. दुसऱ्या पर्वात सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरते. यावर पर्यावरण मंत्रालयाचे वन विभागाचे महानिर्देशक एसपी यादव यांनी माहीती दिली आहे. ते म्हणतात, प्रोजेक्ट चित्ताच्या दुसऱ्या पर्वात त्यांच्या प्रजननावर लक्ष देण्यात येईल असे म्हटले आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावर रेडिओ कॉलरची उपाययोजना करण्यात आली होती. हे कॉलर दक्षिण आफ्रिकेत बनवल्या जाणाऱ्या नवीन कॉलरबरोबर बदलले जाईल अशीदेखील त्यांनी माहीती दिली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, आफ्रिकेतून आणखी चित्ते आणले जाणार आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत हे चित्ते आणले जाऊ शकतात. गांधी सागर अभयारण्य आणि नौरादेही या दोन अभयारण्यात या चित्त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, कारण कुनो नॅशनल पार्कमध्ये २० चित्यांची क्षमता आहे.

सध्या या कुनो नॅशनल पार्कमध्ये १५ चित्ते आहेत. अशी माहीती एसपी यादव यांनी दिली आहे.प्रोजेक्ट चिताच्या पहिल्या वर्षात चित्त्यांच्या संवर्धनासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागला. आता दुसऱ्या पर्वात या अडचणी कमी होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

Goa Accident: कानात इअरफोन लावून चालला रुळावरून, रेल्वेने दिली धडक; झारखंडच्या तरुणाचा सांकवाळ येथे मृत्यू

Rashi Bhavishya 15 July 2025: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

IND vs ENG: थ्रीलर सामन्यात इंग्लंड सरस! लॉर्ड्सवर भारताचा 22 धावांनी पराभव; रवींद्र जडेजाची झुंजार खेळी ठरली एकाकी

Viral Video: थिरकली नागिन, वाजवली बीन! काकाचा हसीनासोबतचा 'डान्स' पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT