Amritpal Singh Dainik Gomantak
देश

Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, पंजाबमध्ये हाय अलर्ट

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या जवळच्या 78 साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Amritpal Singh पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. अमृतपाल सिंगला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पंजाबमधील अमृतसर, फाजिल्का, मोगा आणि मुक्तसरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या जवळच्या 78 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल ज्या ठिकाणी लपल्याची शक्यता आहे, त्या ठिकाणाला सात जिल्ह्यांच्या पोलिसांनी घेराव घातला आहे. असे पंजाब पोलिसांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

जालंधरमधील शाहकोटच्या महेतपूर गावाजवळ अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी घेरले होते. अमृतपाल सिंगच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

अमृतपाल सिंग शाहकोटमध्ये आल्याची पूर्व माहिती पोलिसांना होती. त्यामुळे मोगा पोलिसांनी मोगा आणि शाहकोटचे सर्व रस्ते आधीच बंद करून नाकेबंदी केली.

पोलिसांनी यापूर्वी त्याच्या सहा साथीदारांना अटक केली होती. उर्वरितांना सायंकाळी अटक करण्यात आली. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून पंजाबमधील अनेक भागात इंटरनेट बंद केले होते.

पंजाबमधील मोबाईल इंटरनेट 20 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. एसएमएस सेवेवरही बंदी घालण्यात आली आहे. फक्त व्हॉईस कॉल सुरू राहतील. यापूर्वी ही बंदी 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत होती. ती पुढील 24 तासांसाठी वाढवण्यात आली.

अमृतपाल सिंगला अटक करण्याची योजना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान तयार करण्यात आली होती. 2 मार्च रोजी दोघांमध्ये झालेल्या बैठकीत कथितपणे चर्चा झाली होती.

दरम्यान, पोलिसांना चकमा देऊन अमृतपाल फरार झाला. पोलिसांनी त्यांच्या वाहनातून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अमृतपाला देखील लवकरच अटक केली जाईल. असे अमृतसरच्या एसपी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT