Priyanka Gandhi Vadra Dainik Gomantak
देश

Lakhimpur Kheri violence: अखेर प्रियांका गांधींना अटक

तसेच त्यांना सीतापूरमधील (Sitapur) पीएसी अतिथीमध्ये ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी हिंसाचारातील (Lakhimpuri Kheri Violence) पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना सीतापूरमधील पीएसी अतिथीमध्ये ठेवण्यात आले आहे.

रविवारी लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर त्याच रात्री प्रियांका गांधी लखनौला पोहोचल्या होत्या. तिथून त्या लखीमपूरला रवाना झाल्या मात्र सोमवारी पहाटे पोलिसांनी त्यांना हरगाव येथे रोखले. असे सांगण्यात आले की, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या अटकेची बातमी येताच कॉंग्रेस समर्थकांनी पीएसी गेस्ट हाऊसच्या बाहेर गर्दी करायला सुरुवात केली.

या कलमांखाली गुन्हा दाखल

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांच्या विरोधात कलम 151, 107 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. एसडीएम सीआरपीसीच्या कलम 116 अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. प्रियांका सोमवारी सकाळपासून पीएसी गेस्ट हाऊसमध्ये होत्या. हे गेस्ट हाऊस तात्पुरते जेल बनवण्यात आले असून प्रियांका गांधी यांना अटक करुन तेथे ठेवण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांना 4 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हरगावच्या एसएचओने या प्रकरणाचा अहवाल मजिस्ट्रेटना पाठवला आहे. एसडीएम स्वतः गेस्ट हाऊसमध्ये जाऊन या प्रकरणाची सुनावणी करतील.

प्रियांकाच्या अटकेवर प्रतिक्रिया येऊ लागल्या

काँग्रेस नेते पी. चिदंबरम (Congress leader P. Chidambaram) यांनी प्रियांका यांच्या अटकेला लज्जास्पद म्हटले आहे. ते म्हणाले, 'हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि लज्जास्पद आहे. पहाटे साडेचार वाजता एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सूर्योदयापूर्वी अटक केली. मात्र त्यांना अद्याप दंडाधिकाऱ्यांकडे नेण्यात आलेले नाही. चिदंबरम पुढे म्हणाले, 'कायद्यातील अनेक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अर्थ वेगळा आहे. तिथे कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे आदित्यनाथांची व्यवस्था. या कारवाईमध्ये प्रियांका गांधी यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.

त्याचवेळी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी ट्वीट करुन म्हटले की, 'जेव्हाही शंका असेल तेव्हा सत्याच्या मार्गाचा अवलंब करा. आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करु नका. आणि मोरल अथॉरिटीचे नाव प्रियंका गांधी आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'लखीमपूर हिंसाचाराने देश हादरला आहे. प्रियांका गांधींना योगी सरकारने अटक केली आहे. यूपीमध्ये सरकारच्या दडपशाहीविरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे.

प्रियांकाने सकाळी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता

प्रियांका गांधी यांनी आज सकाळी पीएसी गेस्ट हाऊसमधून एक व्हिडिओ संदेशही जारी केला होता. लखीमपूर हिंसाचाराला एका वाहनातून पायदळी तुडवल्याचा व्हिडिओ दाखवत त्यांनी पंतप्रधान मोदींना विचारले की, त्यांना कधी अटक केली जाईल. प्रियंका पुढे म्हणाल्या, 'हा व्हिडिओ बघा आणि या देशाला सांगा की या मंत्र्याला मंत्रीपदावरुन पायउतार अजून का करण्यात आले नाही? आणि त्यांच्या मुलाला अजून अटक का झाली नाही? तुम्ही माझ्यासारख्या विरोधी नेत्यांना कोणत्याही आदेशाशिवाय, कोणत्याही एफआयआरशिवाय ताब्यात घेतले आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की हा माणूस अजून मुक्तपणे कसा काय फिरतो आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT