UP Election Result 2022 updates | Priyanka Gandhi News | Rahul Gandhi News  Dainik Gomantak
देश

राहुलसोबत प्रियांकाही फ्लॉप; यूपीसह 5 राज्यांमध्ये कॉंग्रेसचा सुफडा साफ

यूपीमध्ये पक्षाला 3 टक्के मतेही मिळवता आली नाहीत

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपने चार राज्यांमध्ये बाजी मारली असताना काँग्रेस पुन्हा एकदा सपशेल अपयशी होताना दिसत आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाची निवडणूक यावेळी विशेषतः उत्तर प्रदेशात अत्यंत लाजिरवाणी ठरली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (priyanka-gandhi) यांनी यूपीमध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतली असली, तरी राज्यातील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निम्म्यावर आली आहे. यूपीमध्ये पक्षाला 3 टक्के मतेही मिळवता आली नाहीत. (UP Election Result 2022 updates)

इतकेच नाही तर पंजाबमध्ये जिथे काँग्रेसची सत्ता होती तिथेही पक्षाचा मतसाठा 2017 च्या 38.5% वरून 2022 मध्ये 23.3% पर्यंत घसरला आहे. याशिवाय 2017 मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला काँग्रेस गोवा आणि मणिपूरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दोन्ही राज्यांत पक्षाच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.

2017 च्या तुलनेत मणिपूरमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निम्मी

मणिपूरमध्ये (Manipur) काँग्रेसची अवस्थाही वाईट आहे. येथे 2017 मध्ये 35.1% असलेला कॉंग्रेसचा मतसाठा 2022 मध्ये निम्मा होऊन 17% झाला आहे. यासोबतच काँग्रेससोबतची (Congress) युती येथील मित्रपक्षांसाठी विनाशकारी ठरली आहे. 2017 मध्ये 3 जागा जिंकणारा प्रादेशिक पक्ष GFP आता काँग्रेससोबत युती केल्यानंतर केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT